Header Ads

 • Breaking News

  पंचायत समित्यांवर भाजपचा बोलबाला !

  नगर l DNA Live24 - पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापती पदासाठी घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत जिल्ह्यात सर्वाधिक चार पंचायत समित्यांचे सभापती पद ताब्यात घेत भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले.

  ज्या चार पंचायत समित्यांवर भाजपचे सभापती झाले त्यापैकी कर्जत- जामखेड व पाथर्डी या ठिकाणी भाजपचेच आमदार आहेत. तर भाजपचा आमदार नसलेल्या श्रीगोंद्यात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. कर्जत -जामखेड येथील निवड पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रतिष्ठेची होती. त्यात त्यांनी बाजी मारली.

  शिवसेनेनेही नगर व अकोले पंचायत समिती आपल्या ताब्यात घेत पंचायत समितीवर भगवा फडकवला. अकोले पंचायत समितीवर पहिल्यांदाच शिवसेनेचा सभापती असणार आहे. अकोल्यात सभापती पदाच्या निवडीवेळी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे ऐनवेळी शिवसेनेने भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादीशी संधान साधले. त्यावेळी शिवसेनेच्याच दोन गटात किरकोळ वाद झाले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने प्रकरण मिटले.

  राष्ट्रवादीने राहुरी, शेवगाव व कोपरगाव या तीन पंचायत समित्यांवर आपल्या उमेदवारांना सभापती बनवत आम्हीही कोंग्रेस्पेक्षा कमी नाही हे दाखवून दिले.  राहुरीत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी जोरदार पुनरागमन करत सत्ता ताब्यात घेतली. शेवगावला जिल्हाध्यक्ष घुले यांनी आपल्या चिरंजीवांना सभापती केले. तर कोपरगावला राष्ट्रवादीच्या काळे गटाने पहिल्यांदाच पंचायत समितीत शिरकाव केला.

  निवडणुकी दरम्यान श्रीरामपुरात ससाणे विरोधी झालेल्या महाआघाडीने पंचायत समितीवर आपलाच सभापती निवडण्यात यश मिळविले. श्रीरामपूरला समसमान मतदान झाल्याने चिट्ठी काढण्यात आली. त्यामध्ये दीपक पटारे यांना लॉटरी लागली. तिकडे नेवाशात माजी आमदार शंकरराव गडाख यांच्याच ताब्यात सर्व सत्तास्थाने असल्याने त्यांनी आपल्या सौभाग्यवतींना सभापती पदावर बिनविरोध विराजमान केले.

      कोणत्या पक्षाकडे कुठली पंचायत समिती- 
  भाजपा - ४ ( कर्जत,जामखेड,श्रीगोंदा,पाथर्डी ),
  कॉंग्रेस - ३ (पारनेर,संगमनेर,राहाता)
  राष्ट्रवादी - ३ (राहुरी,शेवगाव,कोपरगाव),
  शिवसेना - २ (अकोले,नगर तालुका),
  महाआघाडी - १ (श्रीरामपूर),
  शेतकरी क्रांतीकारी पक्ष - १ ( नेवासा )

  पंचायत समित्यांचे नवे सभापती- उपसभापती  
  नगर - रामदास भोर, कांताबाई कोकाटे,
  श्रीरामपूर - दिपक पटारे, बंडु तोरणे
  राहुरी - मनिषा ओहोळ, रविंद्र आढाव
  जामखेड- सुभाष आव्हाड, राजश्री मोरे,
  पारनेर - राहुल झावरे, दिपक पवार
  पाथर्डी - चंद्रकला खेडकर, विष्णूपंत अकोलकर,
  शेवगांव - क्षितिज घुले , शिवाजी नेमाणे
  कर्जत - पुष्पा शेळके , प्रशांत बुधवंत
  अकोले - रंजना मेंगाळ , मारूती मेंगाळ
  श्रीगोंदा - भैय्या लगड, प्रतिभा झिटे
  संगमनेर - मनिषा कोकणे, नवनाथ आरगडे
  कोपरगांव - अनुसया होन, अनील कदम
  राहाता - हिराबाई कातोरे, बबलु म्हस्के
   नेवासा - सुनिता गडाख, राजनंदिनी मंडलिक

  Post Top Ad

  Post Bottom Ad