Header Ads

 • Breaking News

  दातांना लागलीय कीड, तर मग करा हे उपाय

  मुंबई । DNA Live24 - दात चांगले राहण्यासाठी आपणास लहानपणापासूनच दोनदा ब्रश करणे शिकविले जाते, मात्र  थोड्या निष्काळजीपणामुळे दातांत कीड लागते. जर दातात कीड लागली तर कोणत्याही व्यक्तीला काहीही खाण्याची मोठी समस्या निर्माण होते. अशावेळी आपण डॉक्टरांकडे जातो आणि त्यावर दात काढणे किंवा कीड काढल्यानंतर तिथे फिलिंग करण्याचा सल्ला दिला जातो.

  मात्र आम्ही आपणास घरगुती उपायांनी दाताना लागलेली कीड कशी घालवायची याबाबत काही टिप्स देत आहोत. यासाठी आपणास जास्त पैसेदेखील खर्च करण्याची गरज नाही. कारण या वस्तू आपणास घरातच मिळणार आहेत.

  हळदीची पुड आणि मीठ एकत्र करुन त्यात जवसचे तेल मिक्स करा. तयार झालेल्या या पेस्टने दिवसातून दोन ते चार वेळेस दात घासा. असे केल्याने दातातील कीड मरतात.

  लवंगचे तेल कापसाच्या बोळ्यात भिजवून कीड लागलेल्या दातावर ठेवा. यामुळे दातातील कीड नष्ट होतात.

  तुरटी, सेंधव मीठ आणि नौसादर सममात्रेत घेऊन बारीक पावडर बनवा. ही पावडर सकाळ-संध्याकाळ दात आणि हिरड्यांना लावा. यामुळे कीड नष्ट होण्यास मदत होईल.

  कोमट पाण्यात तुरटी मिक्स करु न रोज गुळण्या केल्यानेही दातांची कीड आणि दुर्गंधी नष्ट होते.

  वडाच्या झाडाचे दूध कीड लागलेल्या दातांवर लावल्याने कीड मरतात.

  दालचीनीचे तेल कापसात भरून कीड लागलेल्या दातांत लावा. यामुळे दुखणे थांबेल आणि कीडदेखील नष्ट होईल.

  Post Top Ad

  Post Bottom Ad