728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

नगरमध्ये भगवान महावीर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन


अहमदनगर । DNA Live24 - आदर्श व्यापारी मित्र मंडळ, माॅर्निंग क्रिकेट क्लब व सकल जैन संघातर्फे श्री भगवान महावीर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शांतीकुमारजी मेमोरिअल फाऊंडेशन यांच्या सहकार्याने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या क्रिकेट स्पर्धा अशोकभाऊ फिरोदिया हायस्कूलसमोरच्या प्रांगणात १८ एप्रिल ते २३ एप्रिल या कालावधीत होणार आहेत.

स्पर्धेचे पहिले पारितोषिक रोख ४१ हजार रुपये व चषक आहे. द्वितीय पारितोषिक ३१ हजार रुपये रोख व चषक, तृतीय पारितोषिक २१ हजार रुपये रोख व चषक, चतुर्थ पारितोषिक ११ हजार रुपयांचे आहे. याशिवाय प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅचचे ट्रॉफी, सर्व स्पर्धा मिळून मॅन ऑफ द सिरिज, बेस्ट बाॅलर, बेस्ट बॅट्समन, सलग तीन षटकार, हॅट्ट्र्र्रिक साठी आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन नरेंद्र फिरोदिया, राजेंद्र ताथेड, रविंद्र बाकलीवाल, प्रितम पोखरणा यांनी केले आहे.

या स्पर्धा टेलिस बॉलवर होणार असून प्रत्येक सामना १० षटकांचा असणार आहे. साखळी पद्धतीने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. प्रत्येक संघात एक चॉईस प्लेअर, दोन आयकॉन व बाकीचे वर्गवारीप्रमाणे खेळाडू दिले जाणार आहेत. स्पर्धेचे प्रवेश फॉर्म १० मार्च पासून वितरित केले जाणार आहेत. प्रवेश अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १२ मार्चपर्यंत आहे.

प्रवेश अर्ज इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय, महात्मा फुले चौक, मार्केटयार्ड नगर या पत्त्यावर मिळतील. स्पर्धेची नियमावलीही सोबत जोडलेली असणार आहे. प्रथम आलेल्या २४० खेळाडूंनाच या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पवन कटारिया, प्रमोद डागा, धनेश कोठारी, विपुल शेटिया, प्रितम मुथा, समीर बोरा, कौशल पांडे, मेहुल भंडारी, शैलेश मुनोत, अनिल दुगड, राजेंद्र गांधी, प्रमोद गांधी, अनुपम संकलेचा, कुणाल बडजाते, आदी प्रयत्नशील आहेत.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: नगरमध्ये भगवान महावीर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन Rating: 5 Reviewed By: DNA Live24