Header Ads

 • Breaking News

  बनावट दारुकांड - महिला फौजदारासह तिघे निलंबित

  अहमदनगर । DNA Live24 - जिल्हा रुग्णालयातील बनावट दारु रॅकेटच्या पार्श्वभूमीवर तोफखान्याच्या एका महिला पोलिस उपनिरीक्षकासह तिघा पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक अर्चना करपुडे, हवालदार आदिनाथ गांधले व भानुदास बांदल अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत. तर पोलिस निरीक्षक रविंद्र निकाळजे यांची नियंत्रण कक्षात, तर ६ पोलिसांची मुख्यालयात बदली झाली आहे. शुक्रवारी सांयकाळी पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी ही कारवाई केली.

  पांगरमल (ता. नगर) येथे बनावट दारुमुळे ९ जणांचे बळी गेल्यानंतर पोलिस तपासात जिल्हा रुग्णालयातील बनावट दारुनिर्मिती रॅकेट समोर आले. या प्रकरणातील आरोपींसोबत काही पोलिस संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले होते. मंगलगेट पोलिस चौकीची जबाबदारी असलेल्या महिला फौजदार अर्चना करपुडे, पोलिस हवालदार गांधले व बांदल यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक काळात आपल्या हद्दीतील अवैध धंद्यांची माहिती ठेवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे.

  एमआयडीसी पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार शहाजी धुमाळ, नंदकिशोर काटे, एलसीबीतील जितेंद्र गायकवाड, तोफखान्याचे शब्बीर शेख, रविंद्र लबडे व गणेश भिंगारदे यांची मुख्यालयात बदली झाली आहे. पोलिस चौकशीत हे दोषी आढळले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली. तर तोफखान्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र निकाळजे यांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. ्त्यांच्या जागी नारायण वाखारे यांना नियुक्ती देण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईमुळे पोलिस वर्तुळात मात्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

  Post Top Ad

  Post Bottom Ad