728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

‘टिवटिवाटाची’ तपपूर्तीकडे यशस्वी वाटचाल !

नवी दिल्ली । DNA Live24 - ट्विटर ११ वर्षांचं झालं असून या मायक्रोब्लॉगिंग साईटची आता तपपूर्तीकडे यशस्वी वाटचाल सुरू झाली अाहे. २१ मार्च २००६ ला सुरु झालेली ही साईट आज सोशल मीडियाचा अविभाज्य भाग बनली आहे. ट्विटर सुरू झाले तेव्हा खरं तर ऑर्कुट व याहू मेसेंजरचा जमाना होता. फेसबुक सर्वसामान्यांसाठी सुरूही झाले नव्हते. त्यामुळे ब्लाॅग म्हटलं की सगळ्यांच्या नजरेसमोर विस्तृतपणे लिहिण्याचा ब्लाॅग यायचा. 

ट्विटरद्वारे १४० कॅरेक्टर्समध्ये काय लिहिणार? अशी शंका सगळ्यांच्या मनात आली होती. तशी ती खरीही होती. कारण विस्तृतपणे लिहिण्याचा जमाना असताना एवढ्याशा स्पेसमध्ये किती काय लिहिणार, हा विचार मनात येणं साहजिक होते. ट्विटर सुरू झाल्यावरही या टीचभर जागेत ठराविक लोकंच काहीबाही लिहितील, असा या क्षेत्रातल्या तज्ञांचा अंदाज होता. त्यामुळे ही आयडिया फेल होणार असंच मत सगळ्यांनी व्यक्त केलं होतं. पण तसं न होता, काय झालं तो इतिहासच साक्षीदार आहे !

जगातले अनेक राजकीय नेते, फिल्मस्टार्स आणि इतर प्रसिध्द व्यक्तींशी संवाद साधण्याची थेट संधी त्यांच्या फॅन्सना ट्विटरमुळे मिळाली. हे तारेही थेट व्यक्तिगत पातळीवर त्यांच्या चाहत्यांशी बोलू लागले. सुरूवातीला प्रसिध्दीच्या तंत्राचा वापर करत आपली वाढ करणाऱ्या या साईटचा वापर वेगवेगळ्या अंगांनी होत गेला. यूझर्सच्या वापरानुसार ट्विटरचं सायबर स्पेसमधलं महत्त्व आणि योगदान सतत बदलत राहिलं.


ट्विटरबद्दलचे काही तथ्य - 

-आजमितीला ट्विटरचे जगभर सुमारे ३२ कोटी अॅक्टिव्ह यूजर्स आहेत.
- ट्विटर यूजर्सपैकी ८६% ट्विटरचा वापर बातम्या मिळवण्यासाठी करतात.
- जागतिक नेत्यांपैकी ८३% नेते ट्विवरवर. 
-‘टायटॅनिक’ (१९९७) मधून जगभर प्रसिध्द झालेला हाॅलिवूड स्टार लिओनार्डो डिकॅप्रिओला २०१६ साली ‘द रेव्हेनंट’ साठी अभिनय कारकीर्दीतलं सर्वात पहिलं आॅस्कर मिळालं. यावेळी जगभर त्याचे चाहते एवढे खुश झाले, की त्याला आॅस्कर मिळताना त्याच्यासंबंधी मिनिटा जवळजवळ साडेचार लाख ट्वीट्स होत होती.
- जगात सर्वात जास्त ट्विवर फाॅलोअर्स ‘केटी पेरी’चे आहेत.
- केटी ही एक तुफान लोकप्रिय अमेरिकन सिंगर असून तिचे जवळजवळ १० कोटी फाॅलोअर्स आहेत.
- गेल्या दशकात घडलेल्या अनेक राजकीय घटनांवरही ट्विटरचा मोठा प्रभाव पडला.
- २०११ मध्ये इजिप्तमध्ये तिथला हुकूमशहा होस्नी मुबारक याच्या विरूध्द झालेल्या तिथल्या जनतेच्या उठावाच्या वेळी ट्विटरचा वापर करत आंदोलनकर्त्यांनी सामान्य जनतेत माहिती पसरवली होती.
- ट्विटरवर अर्थातच ‘खोटी अकाऊंट्स’सुध्दा आहेत.
- अनेकजण ट्विटरच्या माध्यमातून गरळ ओकण्याचं कामही अतिशय चिकाटीने करतात.
- अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण असेल.

काहीही असले तरी सोशल मीडियाचे एक अविभाज्य अंग असल्यामुळे ‘ट्विटर’ यापुढेही मीडियातला एक ‘महत्वाचा घटक’ राहणार आहे.

हे होते जगातले सर्वात पहिले ट्विट..
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: ‘टिवटिवाटाची’ तपपूर्तीकडे यशस्वी वाटचाल ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24