Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

सोमवार, १३ मार्च, २०१७

दोन वर्षात कल्याण रोड परिसराचा कायापालट करु - महापौर


अहमदनगर । DNA Live24 - कल्याणरोड परिसरामध्ये महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आल्यावर अनेक विकास कामांना सुरूवात झाली. या परिसरातील ड्रेनेज लाईन, अनेक भागातील रस्त्याचे कामे झाले असुन व नागरिकांचा पाणी प्रश्‍नही लवकरच सुटेल. फेज-2 पिण्याचे पाईपलाईनचे काम ह्या भागातही सुरू करण्यात येणार आहे. जेणे करुन नागरिकांना व महिलांना पिण्याच्या पाण्यापासुन होणारा त्रास दुर होईल. दोन वर्षात कल्याण रोड परिसरातील विकास कामे करुन काय पालट करु, असे प्रदिपादन महापौर सुरेखा कदम यांनी केले.

प्रभाग क्रमांक 25 मधील कल्याण रोड परिसरातील अमितनगर येथे रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे शुभारंभ महापौर कदम यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, गटनेता संजय शेंडगे, माजी शहर प्रमुख संभाजी प्रमुख, नगरसेविका उषा ठाणगे, शरद ठाणगे. सचिन शिंदे, सोपान कदम, अंबादास नरसाळे, अशोक पाटील, सुरेंद्र बोऱ्हाडे, सुनिल आकडे, माया गायकवाड, वैशाली आकडे, निता नहार, विजया कदम, पारुनाथ धेकळे, मंगल पंतगे, मंदा शिंदे, उषा मिसाळ, अनिता नरसाळे आदी उपस्थित होते.

शहर प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले, या प्रभागामध्ये नगरसेविका उषा ठाणगे यांनी नागरिकांसाठी सदैव आक्रमक राहुन परिसरात अनेक विकास कामे करुन व उर्वरीत कामही सुरू आहेत. येत्या काळात नक्कीच शिवसेनेच्या माध्यमातुन उत्कृष्ट प्रभाग म्हणुन हा भाग ओळखल्या शिवाय राहणार नाही. संभाजी कदम म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासुन हा प्रभाग विकास कामांपासुन वंचित होता. या भागातील नगरसेविका ठाणगे व नगरसेवक संजय शेंडगे यांच्या माध्यमातुन पुढील काळात जास्तीत जास्त विकास कामे करु.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages