728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

झेडपीच्या अध्यक्षपदी कोण ? आज होणार फैसला !

अहमदनगर l DNA Live24 - राज्यातील सर्वात महत्वाच्या समजल;या जाणाऱ्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याचा फैसला आज होणार आहे. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणाऱ्या सभेत नवीन अध्यक्ष निवडला जाईल.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी काल दिवसभर चर्चेच्या फेऱ्या झडल्या. काँग्रेसचा विखे गट शालिनीताई विखे यांच्यासाठी आग्रही असून, थोरात गट अनुराधा नागवडे यांच्यासाठी फिल्डिंग लावून आहे. त्यामुळे या दोघांमध्ये तडजोडी होणार कि दोन्ही गट आपापले उमेदवारी अर्ज भरणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी ३७ सदस्यांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे. त्यासाठी आघाडी व युतीने जुळवाजुळव सुरु केली आहे. युतीपेक्षा आघाडीचे पारडे सर्वात जड असून, शालिनीताई विखे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

नवीन अध्यक्ष कोण असावा यावर एकमत होण्यासाठी कॉंग्रेस अंतर्गत काल दिवसभर बैठका घेण्यात आल्या. रात्री बराच वेळ बैठक चालली. त्यात काहीतरी निर्णय होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस- राष्ट्रवादीचे बिनसल्यास त्याचा फायदा घेण्यासाठी भाजपने तयारी केली. पालकमंत्री राम शिंदे दिवसभर नगरमध्ये याबाबत रणनीती आखत होते. राष्ट्रवादीने कॉंग्रेसशी काडीमोड घेतल्यास राष्ट्रवादी, क्रांतिकारी शेतकरी पक्ष, शिवसेना यांना सोबत घेऊन सत्ता स्थापण्याची तयारी भाजपने केली आहे.

अशी आहे शक्यता - काँग्रेस २४, राष्ट्रवादी १८, शिवसेना ७ एकूण ४९.
राष्ट्रवादी १८, भाजप १४, शिवसेना ७ एकूण ३९.
काँग्रेस विखे १४, राष्ट्रवादी १८, शिवसेना ७ एकूण ३९.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: झेडपीच्या अध्यक्षपदी कोण ? आज होणार फैसला ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24