Header Ads

 • Breaking News

  महिलांनी स्वत:चे संरक्षण करायला शिकले पाहिजे - रुपाली वारे


  अहमदनगर । DNA Live24 - महिलांनी स्वत:ला संरक्षण करायला शिकलं पाहिजे, त्यासाठी संघटित झालं पाहिजे, असे आवाहन नगरसेविका रुपाली वारे यांनी केले. कचरा वेचक महिला व रुग्णसेवा करणाऱ्या महिलांना श्री साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान व अस्तित्व फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ‘रणरागिणी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी वारे बोलत होत्या.

  अध्यक्षस्थानी मानवाधिकार संघटनेच्या संध्या मेढे होत्या. वयाची शंभरी ओलाडलेल्या दिर्घायुषी निवृत्त सफाई महिला कामगार चाची कुडिया आणि अन्य कर्तुत्व गुणवत्ताप्राप्त तसेच बचत गटात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यात कचरा वेचक विठाबाई साबळे तसेच सुनिता गायकवाड, बचत गटाच्या मोहिनी लोळगे, अंजली शहाणे, डॉ. विद्या त्र्यंबके आदींचा समावेश होता. वसंत टेकडी, संदेशनगर येथील साई मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

  याप्रसंगी नगरसेविका उषा नलावडे, डॉ. शुभांगी शिंदे, स्नेहाधार (स्नेहालय) च्या शिल्पा केदारी, माजी नगरसेविका गिरीजा उडाणशिवे, अस्मिता मंचचे राजेश सटाणकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनिल त्र्यंबके, संस्थापक सदस्य योगेश पिंपळे आदि मान्यवर उपस्थित होते. स्त्रीयांनीच सर्वप्रथम स्त्रीयांना मान दिला पाहिजे, स्त्रीने स्वत:ची ताकद ओळखावी त्यातूनच तिचा आत्माविश्‍वास वाढेल, असा विश्‍वास नगरसेविका नलावडे यांनी व्यक्त केला.

  शिल्पा केदारी यांनी स्मार्टफोन वापर करण्याचे चांगले वाईट परिणाम ठरु शकतात. या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचे प्रकार होतात, त्याचे भान सर्वांनीच लक्षात घ्यावे, असे सांगितले. सर्वसामान्य स्वावलंबी आणि शहर स्वच्छ ठेवणार्‍या कचरा वेचकांचा सन्मान करणे हा स्त्युत्य उपक्रम आहे, समाजात संस्कार करणाऱ्या आणि मैदानी खेळात मुलांना पुन्हा आणण्यासाठी प्रतिष्ठानच्या मैदानात मोफत वर्ग भरविण्याची आवश्यकता आहे, असे राजेश सटाणकर यांनी सांगितले.

  अध्यक्षीय भाषणात मेढे यांनी महिलांनी निर्भय व्हावे. महिलांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मानवाधिकार संघटनेशी संपर्क ठेवावा, असे आवाहन केले. स्वागत पिंपळे यांनी तर प्रास्तविक त्र्यंबके यांनी केले. प्रारंभी विशाल जाधव, यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी हिवाळे यांनी केले

  Post Top Ad

  Post Bottom Ad