Header Ads

 • Breaking News

  सखींनो, थोडा वेगळा विचार करूया !


  महिला दिन विशेष । DNA Live24 -


  महिला दिन !

  कितपत फायदा होतो बरं याचा, आणि कुणाला ?
  कुणाला, हे खरच शोधण्याची गरज आहे.

  मोठे मोठे कार्यक्रम आयोजित होतात, पार्टी अरेंज केली जाते, भिशी ग्रुप ट्रिपला जातात, चर्चासत्र आयोजित केले जातात, पुरस्कार दिले जातात. पण हे कुठे, तर शहरात.... ज्या स्त्रीयांना याची गरज आहे, त्यांच्यापर्यंत कुठे पोहचतो आपण ? महिलांसाठीच्या योजना गरजू माहिलांपर्यंत पोहचवतो का ??   

  आजकाल एक नवीन फॅड आलंय रोड सिलिब्रेशन, रोड वर नाचायचे. योगा करायचा, खायचे, आणि खुप सारे फोटो काढायचे.... आणि बघे मात्र तिथेही पुरुषंच हा... या सर्व ठिकाणी जाणारी स्त्री ही स्वतंत्र नाही का ? किंबहुना ती स्वतंत्र आहे, म्हणुनच ती तिथे जाऊ शकते. पार्टीमध्ये पण नाचणे, गाणे, प्रसंगी पिणे. हे नेहमीच करतो ना ? मग का हवा आपल्याला महिला दिन ?

  हे सर्व जी बंधनांमध्ये ती करू शकते का ?? तिला याची जास्त आवश्यकता आहे. कारण ती हे कधीच करत नाही.... आपण तिला कितपत मदत करतो... तिच्याकडे नाही चालत असे, म्हणून नाक मात्र मुरडतो. हे सर्व कार्यक्रम होतात ते या स्वतंत्र अशा स़्त्रीयांसाठी. खरच गरज असते का तिला या सर्वांची, तिच्या रोजच्या जीवनात हा फक्त थोडासा बदल असतो. 

  ज्या स़्त्रीयांना गरज आहे, अशांच्या घरच्यांना किती समजावतो आपण ?? नोकरी करणारी पण एका हातात पैसे आणि एका हातात पेमेंट स्लिप द्यावी लागते अशाही स्त्रीया आहेत आपल्या कडे. आपली मदतनीस घरात काम करते ,ती पण स्त्रीच ना, तिला देतो का आपण सुट्टी ?? महिला दिन म्हणुन..

  खेड्यातल्या स़्त्रीया, कितीतरी योजना त्यांच्यासाठी राबविल्या जातात. आपल्याला पेपरमध्ये त्या वाचुन माहित असतात. पण त्यांच्यापर्यन्त पोहोचवाव्या वाटतात का आपल्याला ??  

  बरं, महिला दिन का सुरू झाला, याचे उत्तर तरी ठाऊक आहे का आपल्याला ?? 

  सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे स्त्रियांचे कर्तव्य आहे.' अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये. हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. तसेच १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा, असा जो ठराव क्लाराने मांडला, पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. आणि ८ मार्च हा महिला दिन म्हणून साजरा होऊ लागला.

  आपण भरकटत चाललो आहोत का ?
  स्त्री स्वातंत्र म्हणजे फक्त नाच, गाणे ,आणि एकट्यानी पाहिजे ते घालुन फिरणे, इथपर्यंतच मर्यादित ठेवायचे ??
  कि त्या ऐवजी स्वतःला नवीन शिकण्यासाठी प्रवृत्त करायचे ?
  जिला गरज आहे तिला साथ द्यायची ??
  आपण स्वतः नवीन क्षेत्र पादाक्रांत करायचे??
  ज्या काय एका हाताच्या बोटावर मोजणाऱ्या स्त्रीयांनी ते मिळवले आहे, त्यांना फक्त पाहत राहायचे आणि हेवा करायचा ?? 
  आज खूप साऱ्याजणी कपडे दागिने गॉसिप आणि एन्जॉय यापुढे जायलाच तयार नाहीत.
  काहींची तर हद्द आहे ! तिला फेसबुकला इतके फ्रेंड आहेत मग मी पण सगळ्या फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करणार. ती इतक्या किटी पार्टीला जाते मग मी पण जाणार. यातच आपण अडकलोय गं. आपल्यावरच पडणाऱ्या जोक्स ना आपण हसतो, लाइक देतो.. किती विटंबना करतो ना आपण स्वतःचीच ?

  सखींनो, थोडा वेगळा विचार करूया.... 
  स्वतःला घडवुया ! तरच महिला दिनाचा खरा अर्थ समजला असे होईल..!

  -  दिपाली माळी, नगर

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad