Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

बुधवार, १५ मार्च, २०१७

'मी शिवबाचा मावळा' ग्रुपचे कार्य कौतुकास्पद - पो. नि. वाखारे


अहमदनगर l DNA Live24 - मी शिवबाचा मावळा ग्रुप गेल्या अनेक वर्षापासून भिस्तबाग चौक परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. यावर्षी या ग्रुपने शिवजयंतीचे औचित्य साधून  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विविध सामाजिक संदेश देणारे फलकाच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असाच आहे. त्यांच्या या कार्यामुळे समाजात स्त्री भ्रुण हत्या, पर्यावरण, गड - किल्यांचे संवर्धन, आदि विषयी नागरिकांना माहिती देऊन एकप्रकारे प्रबोधन केले आहे. त्याचा नागरिकांना आपल्या आचारणात उपयोग केला तरच शिवरायांना अभिप्रेत असलेले कार्य घडेल, असे प्रतिपादन तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक नारायण वाखारे यांनी केले.

मी शिवबाचा मावळा ग्रुपच्यावतीने प्रोफेसर कॉलनी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आलेल्या रॅलीचा शुभारंभ  पोलिस निरीक्षक नारायण वाखारे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी  सागर बाराहते, सागर बानेवार, गिरीष देशपांडे, अक्षय महांडूळे, तन्मय घोडके, सुचित चव्हाण, गणेश धाडगे, पो.कॉ.महाजन, गर्गे, बोरुडे आदिंसह ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी ग्रुपचे अध्यक्ष सागर बारहाते म्हणाले की, मी शिवबाचा मावळा या ग्रुपची स्थापना सामाजिक स्तरावर शिवजयंती मिरवणुकीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी केली आहे. राष्ट्रीय नेत्यांच्या व राष्ट्र पुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीला डिजेचा थयथयाट व धांगडधिंगा अलिकडच्या काळात दिसून येतो. मात्र यासर्व गोष्टींना फाटा देऊन आम्ही शिवजयंती मिरवणुकीत सामाजिक संदेश देणारे फलकाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

यावेळी ग्रुपच्यावतीने तपोवन रोडवरील मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले.  तसेच जादूगार धनंजय वडितक यांचा करमणुकीचा कार्यक्रमही घेण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर बानेवार यांनीकेले तर सुचित चव्हाण यांनी आभार मानले.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages