Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

शनिवार, २५ मार्च, २०१७

पोलिस होण्यासाठी घातला केसांचा टोप

नाशिक । DNA Live24 - आजवर विविध प्रकारच्या परीक्षांमध्ये पास होण्यासाठी कॉपी करण्याच्या विविध शक्कल लढवणारे महाभाग आपण पहिले असतील. पण, नाशिक पोलिसांच्या शिपाई पदासाठी सुरु असलेल्या भरतीच्या वेळी  मैदानी चाचणी परीक्षेत कोणी कसा चोरी करून पास होऊ शकतो याचे एक वेगळेच उदाहरण समोर आले आहे.

नाशिक शहरात सध्या चालू असलेल्या पोलिस भरतीच्या चौथ्या दिवशी त्र्यंबकेश्वर शहरातून पोलीस भरतीसाठी आलेल्या राहुल किसन पाटील या तरुणाने आपली कमी असलेली उंची वाढवून सांगण्यासाठी केसांच्या टोपचा वापर केला. केसांवर टोप चढवल्याने त्याची आवश्यक असलेली १६५ इंचाहून जास्त उंची भरली होती. मात्र तेथील कॉन्स्टेबल असलेल्या एका चाणाक्ष पोलिसाला राहुलचा संशय आला आणि त्याची बारकाईने तपासणी करण्यात आली. त्यात राहुलने केसांवर टोप घातलेला आढळून आला.

या टोप मध्ये राहुलने आतमधून केस चिटकवले होते. जेणेकरून त्याची उंची नियमात बसावी. मात्र त्याचा हा प्रकार पकडला गेल्यामुळे त्याला भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आता राहुलवर काय कारवाई करण्यात येईल, त्याची उत्सुकता आहे. त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवला जाईल, तसेच त्याची कसून चौकशीही केली जाईल, अशी माहिती परिमंडळ दोनचे सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.

पोलिस दलात भरती व्हावे असे अनेकांचे स्वप्न असते मात्र असे प्रताप करून आपले करिअर बदनाम करवून घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरुणांनी असे प्रकार करू नयेत अन्यथा तुमच्या कारकीर्दीवर असे डाग लागून आजीवन बंदीची कारवाई होऊ शकते, असे आवाहनही सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत धिवरे यांनी केले आहे. राहुलच्या उदाहरणामुळे इतर ठिकाणीही आता युवकांची कसून तपासणी केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot

Pages