728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची पुण्याला बदली


अहमदनगर l DNA Live24 - जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची अखेर पुण्यात नोंदणी महानिरीक्षक पदावर बदली करण्यात आली. कवडे यांच्या जागेवर जिल्हाधिकारी पदासाठी राजेंद्र भोसले, सुनील चव्हाण, विजय काळम पाटील आणि संपदा मेहता यांच्या नावाची चर्चा आहे. त्यात संपदा मेहता यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

जिल्हाधिकारी कवडे यांनी नगरला जिल्हाधिकारी म्हणून १६ फेब्रुवारी २०१४ रोजी पदभार स्वीकारला होता. मागील वर्षी २८ एप्रिल रोजी त्यांची मुंबईला एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त म्हणून बदली झाली होती. मात्र पालकमंत्री राम शिंदे यांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदली रद्द केली होती.

पहिल्यांदा बदली झाल्यावर कवडे यांच्या जागी गडचिरोली जिल्हा परिषदेत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या संपदा मेहता यांची नियुक्ती झाली होती. कवडे यांची बदली रद्द झाल्यावर मेहता यांना पुण्यात नियुक्ती देण्यात आली होती. मेहता या मूळच्या पुण्यातील आहेत. त्यांची नियुक्ती झाल्यास त्या नगरला येणाऱ्या तिसऱ्या महिला जिल्हाधिकारी ठरतील.

यापूर्वी १९९५ ते १९९६ला मेधा गाडगीळ या जिल्हाधिकारी होत्या. तर अनिल कवडे हे नगरला बदलून येण्यापूर्वी रुबल अग्रवाल यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाली होती. परंतु अवघ्या सातच दिवसांत त्यांची जळगावच्या जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली होती.

विजय काळम पाटील हे सध्या सोलापूरला मनपा आयुक्त असून, अमित सैनी सध्या कोल्हापूरला जिल्हाधिकारी आहेत. या दोघांना अद्याप पोस्टिंग मिळालेले नाही. त्यापैक्की अमित सैनी यांनी भंडारा आणि कोल्हापूर या दोन ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. अद्याप 7 आईएएस अधिकारी जे गेल्या दिड वर्षापासून सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत आहेत, त्यांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची पुण्याला बदली Rating: 5 Reviewed By: DNA Live24