728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

डीआयजी कृष्णप्रकाश रविवारी 'रेडिओ नगर'वर

अहमदनगर । DNA Live24 - राज्याच्या विशेष सुरक्षा विभागाचे पोलिस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांच्या एक तासाच्या प्रकट मुलाखतीचे प्रसारण रविवारी (२३ एप्रिल) दुपारी १२ वाजता स्नेहालय संचलित रेडिओ नगर ९०.४ एमएम वरून होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या नगर भेटीच्या निमित्ताने नगर दौऱ्यावर आलेल्या कृष्णप्रकाश यांची ही मुलाखत घेण्यात आली.

रेडिओ नगरच्या वतीने थिंक ग्लोबल फौंडेशनचे अध्यक्ष किरण काळे यांनी 'व्यक्तिवेध' या विशेष कार्यक्रमात ही रोकठोक मुलाखत घेतली. कृष्ण प्रकाश यांचे हजारीबागमधील बालपण, कौटुंबिक पार्श्वभूमी, महाविद्यालयीन काळातील आठवणी, आयपीएस अधिकारी होण्याचे ध्येय नेमके कसे मिळाले, आयुष्याचा टर्निंग पॉईंट काय होता, गडचिरोलीतील पहिले पोस्टिंग, सांगली-मिरज दंगलीत झालेले आरोप, सानंदा प्रकरण, नगरमध्ये जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणून केलेली धडाकेबाज कामगिरी, या मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे.

याशिवाय दुध भेसळ प्रकरणाचा पर्दाफाश, राजश्रयित गुन्हेगारीचा यादरम्यान केलेला बिमोड, मालेगाव दंगल प्रकरण, राजकारणाचे झालेले गुन्हेगारीकरण, पोलिस प्रशासनासमोरील आव्हाने, सोशल मिडियाचा कायदा आणि सुव्यवस्थेवर झालेला परिणाम, आदी विविध मुद्यांवर यावेळी कृष्णप्रकाश यांनी अत्यंत सडेतोड उत्तरे दिली आहेत. “व्यक्तिवेध” सदरातील ही पहिली मुलाखत असून या माध्यमातून जिल्हा व राज्यातील विविध क्षेत्रातील प्रभावशाली कार्य केलेल्या वेगवेगळ्या मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

या मुलाखतीचे पुनर्प्रसारण बुधवारी (२६ एप्रिल) सायंकाळी ५ वाजता होणार आहे. जास्तीत जास्त नगरकरांनी ही मुलाखत ऐकावी असे आवाहन रेडिओ नगरच्या वतीने करण्यात आले आहे. कृष्ण प्रकाश यांची मुलाखत दृकश्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध करण्यात आली अाहे. रेडिओ नगरच्या यु ट्यूब चॅनेलवर ती पाहता येऊ शकते. त्यासाठी ९०. ४ एफएमच्या यु ट्यूब चॅनेलला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: डीआयजी कृष्णप्रकाश रविवारी 'रेडिओ नगर'वर Rating: 5 Reviewed By: DNA Live24