Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

शनिवार, २२ एप्रिल, २०१७

'युवान'च्या 'प्रेरणा' कार्यक्रमात 'सिंघम'ने साधला संवाद !

अहमदनगर । DNA Live24 - तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा परंतु संघर्षाशिवाय जीवनात यश नाही. आपल्या क्षमता, कौशल्य, कल ओळखून निवडलेल्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी काही प्रमाणात धोका पत्करावा लागतो आपल्यावर होणाऱ्या टीका टिप्पणीला बोलण्यापेक्षा कृतीतून उत्तर दिल्यास त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो. आपले कर्तव्य हाच आपला धर्म मानून प्रत्येक कृती देशहीत समोर केल्यास ठेऊन उज्ज्वल भारताचे स्वप्न दूर नाही, असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांनी केले.

युवान आयोजित ‘प्रेरणा’ कार्यक्रमात त्यांनी हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपल्या धीरगंभीर आणि तितक्याच मिश्किल शैलीने त्यांनी सलग दोन तास नवोदित अधिकारी व विद्यार्थ्यांशी संवाद साधत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यंदाच्या एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवलेल्या भूषण अहिरे याचा विशेष गौरव व नगर जिल्ह्यातील यशस्वीत भाऊसाहेब ढोले, अंजुम पठाण, दत्तात्रय भिसे, हर्शल डाके, अमोल पाठक, गोविंद वाकडे, अमोल चव्हाण या विद्यार्थ्यांचा सन्मान कृष्ण प्रकाश, आशाताई फिरोदिया, प्रतिभा धूत , सीए अशोक पितळे यांच्या हस्ते करण्यात आला.

उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब ढोले, सहाय्यक विक्रीकर आयुक्त दत्तात्रय भिसे, कक्ष अधिकारी अंजुम पठाण यांनीही यावेळी आपली मनोगते व्यक्त केली. योगायोग म्हणजे यातील अनेकांची मुलाखत घेणाऱ्या पॅनलमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांचा समावेश होता. आपल्या चिरपरिचित मैत्रीपूर्ण शैलीने त्यांनी मुंबईला मुलाखतीच्या वेळी निर्माण झालेली भीती कशी लगेच दूर केली, याचा खुलासा केला.

विविध कायद्यासह त्यांचा नगर जिल्ह्याचा अभ्यास विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा, समजुतीचा मोठा कस पाहणारा ठरल्याचे विद्यार्थ्यांनी आवर्जून नमूद केले. अधिकारी होऊनही समाजाशी विशेतः वंचित बांधवांशी असलेली नाळ तुटू न देता अधिकारी कसा असावा, याचा आदर्श वस्तुपाठच त्यांनी नवोदित अधिकाऱ्यांना घालून दिला.

यावेळी कृष्णप्रकाश यांनी गांधीवादी समाजसेवक सुब्बराव यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाने स्थापित ‘युवानच्या’ कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. नगरच्या अधिकाधिक युवकांनी ‘युवानच्या’ उपक्रमांचा नियमित लाभ घेऊन सेवा कार्यात आपले यथाशक्ती योगदान द्यावे, असे आवाहन केले. मागील वर्षभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या ‘युवान’ विद्यार्थ्यांचा सन्मान ही यावेळी कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आला. यात विक्रीकर निरीक्षक महादेव लांडगे, रवींद्र जगधने, नामांकित खाजगी कंपनीत परिसर मुलाखतीद्वारे निवड झालेल्या सुधीर पालवे, गणेश हंडाळ, संभाजी मोहिते यांचा समावेश होता.

प्रास्ताविकात संदीप कुसळकर यांनी कार्यक्रमा मागील ‘युवानची’ भूमिका विशद केली. स्पर्धा परीक्षेसारख्या ‘सेवा’ क्षेत्रातही खाजगी क्लासेसच्या वाढत्या व्यवसायिकीकरणाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. सामान्य घरातील गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत व अद्ययावत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा मनोदय व्यक्त केला. त्यास उपस्थित अधिकाऱ्यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत सर्वोतोपरी सहयोगाचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले.

सर्व उपस्थितांचे आभार सचिव सुरेश मैड यांनी मानले. संजय दळवी, हेमंत लोहगावकर, गोरख दराडे, सुप्रिया मैड, पूजा फसले यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. विशेष म्हणजे ऑक्सिकुल पुणेचे निलेश शेळके यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध केले.
सभागृह हाऊसफुल्ल ! - हार, फुले, शाली या पारंपारिक वस्तू न देता हस्तलिखित मानपत्र, पुस्तक, पर्यावरण पूरक पेपर बॅग, कागदी फुले, ग्रीटिंग्स देऊन या सर्वांचा सन्मान करण्यात आला. सावेडीतील माऊली सभागृहातील कार्यक्रमाच्या गर्दीने यावेळी उच्चांक गाठला. सकाळी १० वाजताच सभागृह हाऊसफुल झाले. ११ वाजेपर्यंत सभागृहापेक्षा सभागृहाबाहेरील गर्दी अधिक झाल्याने ‘टीम युवानने’ तातडीने बाहेरील विद्यार्थ्यांसाठी एलइडी टीव्हीची व्यवस्था केली. त्यामुळे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून मार्गदर्शन ऐकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना लाइव्ह कार्यक्रमाचा आनंद घेता आला.

पोलिस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांचे प्रेरणादायी भाषण - (साभार - यु ट्युबवरुन)कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot

Pages