728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

रंजन कुमार शर्मा नगरचे नवे पाेलिस अधीक्षक

अहमदनगर । DNA Live24 - नागपूर शहर विभागाचे पोलिस उपायुक्त रंजन कुमार शर्मा यांची नगरचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने गुरुवारी रात्री उशिरा राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यामध्ये शर्मा यांचाही समावेश आहे. नगरचे पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांची मुंबई शहरात पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. 

नगरचे नवे पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा आयपीएस अधिकारी आहेत. नागपूर शहर विभागात क्राईमचे उपायुक्त आहेत. गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात माहीर असलेले, कडक शिस्तीचे व बेसिक पोलिसिंगवर भर देणारे अधिकारी म्हणून ते परिचित आहेत. आगामी एक-दोन दिवसांत ते नगरची सूत्रे स्वीकारतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

नगर शहर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक तथा सहायक पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांची वर्धा जिल्ह्यात अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून बढतीवर बदली झाली आहे. पंडित हेही भारतीय पोलिस सेवेतून (अायपीएस) पोलिस दलात रुजू झालेले आहेत. त्यांच्या कार्यकाळात नगर शहरात विविध सण-उत्सव शांततेत पार पडले. प्रशिक्षणानंतर त्यांची नगर शहर उपविभागात नियुक्ती झालेली होती.

श्रीरामपूर विभागाचे अपर पोलिस अधीक्षक संजय जाधव यांचीही धुळ्याच्या पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी नवे अपर पोलिस अधीक्षक लवकरच दाखल होतील. तथापि, नगर शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक चिन्मय पंडित यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी अद्याप नवीन अधिकारी आलेले नाहीत. त्यामुळे काही दिवस हे पद रिक्त राहण्याची शक्यता आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: रंजन कुमार शर्मा नगरचे नवे पाेलिस अधीक्षक Rating: 5 Reviewed By: DNA Live24