Header Ads

 • Breaking News

  नगर ZP : समित्यांवरही आघाडीचेच वर्चस्व


  अहमदनगर । DNA Live24 - जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या सभापती पदावरही काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचेच वर्चस्व कायम राहिले. या पदांसाठी सोमवारी झालेली निवडणूक बिनविरोध पार पडली. जिल्हा परिषदेत काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीला पूर्ण बहुमत मिळाल्याने सभापती पदांवरही आघाडीचेच वर्चस्व राहिले.

  महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या अनुराधा नागवडे, समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे उमेश परिहर, विषय क्रमांक एक समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे कैलास वाकचौरे, तर विषय क्रमांक दोन समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे अजय फटांगरे हे चौघे बिनविरोध निवडून आले. जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

  काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात दोन दोन समित्यांवर एकमत होते. काँग्रेसमध्ये थोरात गटाने दोन्ही सभापती पदांवर दावा सांगितला होता. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर महिला निवडून आल्याने सभापती पदासाठीही महिलांनी पुढाकार घेतला होता. सभापतीपदासाठी विरोधी गटाकडूना कोणीही अर्ज न भरल्यामुळे या निवडी बिनविरोध पार पडल्या.

  अशा होत्या दिवसभरातील घडामोडी -


  3:26 PM : विषय क्रमांक दोनच्या समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे अजय फटांगरे यांची बिनविरोध निवड जाहीर..

  3:24 PM : विषय क्रमांक एकच्या समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे कैलास वाकचौरे यांची बिनविरोध निवड जाहीर..

  3:22 PM : समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे उमेश परिहर यांची बिनविरोध निवड जाहीर..

  3:20 PM : महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या अनुराधा नागवडे यांची बिनविरोध निवड जाहीर..

  3:18 PM : थोड्याच वेळात चारही समित्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडीची होणार औपचारिक घोषणा..

  3:15 PM : दिलेल्या मुदतीत कोणीही अर्ज माघारी घेतला नाही..

  3:11 PM : अर्ज माघारी न घेतल्यास चारही समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध होणार..

  3:10 PM : उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी दिला ५ मिनिटे वेळ..

  3:05 PM : दाखल झालेली सर्व नामनिर्देशनपत्र मंजूर..

  2:55 PM : थोड्याच वेळात होणार सभापती निवडीचा कार्यक्रम सुरू..

  1:15 PM : तीन वाजता होईल चारही समित्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणा..

  1:05 PM : आतापर्यंत : महिला व बालकल्याण समितीसाठी - अनुराधा नागवडे (काँग्रेस), कृषी व पशुसंवर्धन समितीसाठी अजय फटांगरे (काँग्रेस), अर्थ व बांधकाम समितीसाठी कैलास वाकचौरे (राष्ट्रवादी), समाजकल्याण समितीसाठी उमेश परहर (राष्ट्रवादी) यांचे अर्ज दाखल.

  1:00 PM : समिती पदाधिकारी पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली..

  12:58 PM :सर्व समित्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी बिनविरोध होण्याची दाट शक्यता..

  12:58 PM : चार समित्यांसाठी चारच अर्ज दाखल..

  12:55 PM : अर्ज घेण्यासाठी उरले अवघे पाच मिनिटं..

  12:40 PM : निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांची नियुक्ती..

  12:35 PM : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत पोलिस बंदोबस्त तैनात..


  12:30 PM : राष्ट्रवादीकडून समाजकल्याण समितीसाठी उमेश परहर यांचा अर्ज दाखल..

  12:25 PM : राष्ट्रवादीकडून अर्थ व बांधकाम समितीसाठी कैलास वाकचौरे यांचा अर्ज दाखल..

  12:20 PM : काँग्रेसकडून अजय फटांगरे यांचा कृषी व पशुसंवर्धन समितीसाठी अर्ज दाखल..

  12:15 PM :  काँग्रेसकडून अनुराधा नागवडे यांचा महिला व बालकल्याण समितीसाठी अर्ज दाखल..

  11:55 AM :  बैठकांनंतर अर्ज घेण्यास होईल सुरूवात..

  11:50 AM : काँग्रेस राष्ट्रवादीच्या सकाळीच स्वतंत्र बैठकाही पार पडल्या..

  11:45 AM : मोर्चेबांधणीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीची एकत्रित बैठक सुरू..

  11:30 AM : जिल्हा परिषदेच्या सभापती पदासाठी अर्ज भरण्यास सुरुवात..

  11:25 AM : महिला व बालविकास, स्थायी समिती, तसेच अर्थ व बांधकाम समित्यांसाठी होणार निवड

  11:15 AM : जिल्हा परिषदेच्या सभापती पद निवडणुकीसाठी जय्यत तयारी..

  ( ताज्या अपडेट्ससाठी हे पेज रिफ्रेश करत रहा ) ..

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad