728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

नेवासा तालुक्यासाठी ४ कोटींचा निधि मंजूर!

नेवासे l DNA Live24 - महाराष्ट् राज्य पर्यटन महामंडळाने नेवासे तालुक्याला पुन्हा एकदा ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिली.

मागील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात व पर्यटनमंत्री जयकुमार रावल व राज्य मंत्री येरावार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पर्यटन विकास निधीला मंजुरी देण्यात आली.

यामध्ये नेवासा तालुक्यातील ४ तीर्थक्षेत्रांना निधी देण्यात आला. त्यात देवगड येथे नवीन यात्री निवास बांधण्यासाठी २४३ लाख, देवगाव येथील राम मंदिरासाठी ३३ लाख, जेऊर येथील यमाई माता मंदिरासाठी ६६ लाख तर बालाजी देडगाव येथील बालाजी मंदिर परिसरासाठी ५४ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. त्यातील १ कोटी ३० लाख रुपये ताबडतोब वर्गही करण्यात आले. त्यामुळे सदरची कामे त्वरित सुरु होतील.

नेवासा तालुका तीर्थक्षेत्रांचा व पौराणिक ठिकाणांचा तालुका आहे. शिंगणापूर, ज्ञानेश्वर येथे भारतातून येणारा भाविक, ग्रामीण भागातील छोट्या छोट्या तीर्थाक्षेत्रांकडे वळवून तीर्थ क्षेत्र पर्यटन वाढावे यासाठी आपला प्रयत्न असल्याचे सांगून आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले कि, नेवासा शहरात ज्ञानेश्वर मंदिरासाठी मागील २ महिन्यापूर्वी १२.५ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: नेवासा तालुक्यासाठी ४ कोटींचा निधि मंजूर! Rating: 5 Reviewed By: DNA Live24