Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

सोमवार, ३ एप्रिल, २०१७

राष्ट्रीय स्तरावरील फोटोग्राफी स्पर्धेत अनिल पाटील प्रथम

नाशिक । DNA Live24 - कॅनन व बेटर फोटोग्राफी यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील 'वेडिंग फोटोग्राफर ऑफ द इयर' स्पर्धेत छायाचित्रकार अनिल पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवला.  तब्बल २४ हजार ७८५ स्पर्धकांवर मात करत त्यांनी 'फाइनर वेडिंग डिटेल्स अँड स्टिल लाइफ' या गटात प्रथम पारितोषिक पटकाविले.

विशेष म्हणजे याच स्पर्धेत २००९ सालातही त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. मुंबईत नुकत्याच झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात अनिल पाटील यांना आंतराष्ट्रीय छायाचित्रकार सेफी बर्गरसन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

बेटर फोटोग्राफीचे मुख्य संपादक माधवन पिल्लई, आंतरराष्ट्रीय स्तरावरील फोटोग्राफर प्रकाश तिलोकानी, कॅनन इंडियाचे उपाध्यक्ष इडी उदगवा, फोटो इक्विपमेंटचे उपाध्यक्ष पुलीन सोनी, बेनक्यू इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजीव सिंग, मॅन फ्रंटोचे व्यवस्थापक मुकूल कश्यप, अॅडॉब इंडियाचे विपणन व्यवस्थापक नंदा चावला, शारी अकॅडमीचे मुख्य संचालक गिरीश मिश्री अशा विविध दिग्गजांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.

अनिल पाटील यांनी गेल्या आठ वर्षांत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील निसर्ग, क्रिडा, लॅण्डस्केप, कुंभमेळा, विवाह अशा विविध विषयांवरील फोटोग्राफी स्पर्धेत आजवर १६ पारितोषिके पटकाविली आहेत. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

सहा गटांतून स्पर्धक - संपूर्ण देशभरातील २८१ शहर व तालुक्यांतून तब्बल २४ हजार ७८५ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धकांच्या निवड प्रक्रियेसाठी जगभरातून ७५ परीक्षक लाभले होते. सप्टेंबर २०१६ पासून या स्पर्धेला प्रारंभ झाला होता. त्यात प्राप्त झालेल्या छायाचित्रांतून डिसेंबर २०१६ मध्ये सहा गटांतील ३६ नामांकने जाहीर करण्यात आली होती. त्यातून अंतिम फेरीत प्रत्येक गटासाठी केवळ एकाच स्पर्धकाची निवड केली गेली. त्यात अनिल पाटील यांनी 'फाइनर वेडिंग डिटेल्स अँड स्टिल लाइफ' या गटात प्रथम पारितोषिक पटकाविले.
कलेला पारितोषिकांचे बळ - पारितोषिक स्वरुपात विजेत्यांना फोटोग्राफीसाठी उपयुक्त आधुनिक साहित्याची भेट देण्यात आली. त्यात कॅननने प्रिंटर, बेनक्यूच्या वतीने मॉनिटर, मॅनफ्रंटोच्या वतीने ट्रायपॉड, इलीनक्रोम लाइट्स आणि फोटोशॉप व लाइटरुम सदस्यत्त्व आणि सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages