Our Feeds

गुरुवार, २७ एप्रिल, २०१७

DNA Live24

कुस्तीप्रेमींनी अनुभवला रणरागिणींच्या दंगलीचा थरार

जिल्हा चषक कुस्ती स्पर्धेत आकाश भिंगारे विजयी 


अहमदनगर । DNA Live24 - छबु पैलवान क्रीडा नगरी, वाडियापार्क क्रीडा संकुलमध्ये जिल्हा तालीम संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हा चषक कुस्ती स्पर्धेत खुल्या गटाच्या अंतिम सामन्यात आकाश भिंगारे याने आक्रमक खेळ करुन विक्रम शेटे याला आसमान दाखविले. अर्धा तास चाललेली रोमांचक कुस्ती भिंगारे याने निकाली काढली. विजयी ठरलेल्या भिंगारेला चांदीची गदा, पदक व 35 हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.

यावेळी जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, उपाध्यक्ष रामभाऊ नळकांडे, रामभाऊ लोंढे, सुभाष लोंढे, संभाजी लोंढे, उद्योजक राजेंद्र चोपडा, विलास चव्हाण, नामदेव लंगोटे, नाना डोंगरे, संतोष रोहकले, मोहन हिरणवाळे, कैलास हुंडेकरी, हंगेश्‍वर धायगुडे, शबनम शेख, भाऊसाहेब धावडे आदि उपस्थित होते.

युवा मल्ल व महिला कुस्तीपटूंच्या लाल मातीत डोळ्याचे पारणे फेडणारे कुस्त्या रंगल्या होत्या. कुस्त्या पहाण्यासाठी नगरकरांनी मोठी गर्दी केली होती. कर्जतची कुस्तीपटू सोनाली मंडलिक हिने पुरुष मल्लांना आवाहन केल्यानुसार, प्रतिस्पर्धी मल्लावर विजय मिळवला. लालमातीत उतरलेल्या रणरागीनी महिला कुस्तीपटूंनी उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण केले.

स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे महिला 42 किलो वजन गट प्रथम- धनश्री फंड (श्रीगोंदा), द्वितीय- प्रियंका डोंगरे (निमगाव वाघा ता.नगर), तृतीय- ज्ञानेश्‍वरी मोरे (श्रीगोंदा). 48 किलो वजन गट प्रथम- रुपाली अडसूरे (राहुरी), द्वितीय- प्रतिभा डोंगरे (निमगाव वाघा ता.नगर) तृतीय- कामिनी कांबळे (कर्जत). 55 किलो वजन गट प्रथम- सोनाली मंडलिक (कर्जत), द्वितीय- माधुरी खरमाळे (भाळवणी ता. पारनेर), तृतीय- सायली कळमकर (भाळवणी ता. पारनेर).

60 किलो वजन गट प्रथम- भाग्यश्री फंड (नगर) द्वितीय- माधुरी भोसले (जामखेड), तृतीय-सानिया चुडेवाला (नगर शहर) या वजन गटातील विजयी महिला कुस्तीपटूस स्मृतीचिन्ह, मेडल व 3 ते 5 हजार रुपया पर्यंतचे बक्षिसे देण्यात आली. पुरुष 35 किलो वजन गटात प्रथम- प्रविण गिरे (अकोला), द्वितीय- अक्षय नळकांडे (नगर), तृतीय- चैतन्य रोहकले (भाळवणी ता.पारनेर). 42 किलो वजन गट प्रथम- सौरभ शिंदे (पिंपागाव वाघा), द्वितीय- प्रशांत रोहोकले (भाळवणी), तृतीय- लक्ष्मण धनगर (नगर).

48 किलो वजन गट प्रथम- ओंकार मुरकुटे (लिंबी ता.श्रीगोंदा), द्वितीय- तेजस ढवळे (रुईछत्तीसी ता.नगर), तृतीय- शुभम मासुळकर (भाळवणी ता.पारनेर). 57 किलो वजन गट प्रथम- सुशांत भुजबळ, द्वितीय- आदेश रायकर, तृतीय- सोमनाथ रोहोकले (सर्व पै. भाळवणी ता.पारनेर). 65 किलो वजन गट प्रथम- विकास गोरे (रुईछत्तीसी),  द्वितीय- वैभव डेंगळे (संगमनेर), तृतीय- सतीश शिंदे (नगर). या वजन गटातील विजयी मल्लांना तीन ते पाच हजार रुपया पर्यंत रोख पारितोषिके देण्यात आली.

74 किलो वजन गट प्रथम- वैभव शेटे (कर्जत), द्वितीय- विकास सासवडे (नगर), तृतीय- विशाल शिंगाडे (कौडगाव) या गटातील मल्लास अनुक्रमे 11 हजार, 8 हजार व १ हजार रुपयाचे बक्षिस देण्यात आले. खुला वजन गटात प्रथम- आकाश भिंगारे (नगर), द्वितीय- विक्रम शेटे (कर्जत) व तृतीय- तुषार सोनवणे (श्रीगोंदा) या गटात उपविजयी मल्लास 21 हजार रु. मेडल व तृतीय विजयी मल्लास 5 हजार रुपयाचे पारितोषिक उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले.

स्पर्धेचे पंच म्हणून संभाजी निकाळजे, पैलवान गणेश जाधव, मनोज शिंदे, महिला कुस्ती प्रशिक्षक शबनम शेख यांनी तर अंतिम सामन्याचे पंच म्हणून संभाजी लोंढे यांनी काम पाहिले. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जिल्हा तालिम संघाचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. ही स्पर्धा पाहण्यासाठी नगरसह परजिल्ह्यातील कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

Subscribe to this Blog via Email :
Previous
Next Post »