Header Ads

 • Breaking News

  कोपर्डी खटल्यातील आरोपींवर प्राणघातक हल्ला

  अहमदनगर । DNA Live24 - कोपर्डी (ता. कर्जत) खटल्यातील आरोपींना नगरच्या जिल्हा न्यायालयात शनिवारी हजर करण्यासाठी आणले असता, या आरोपींवर न्यायालयाच्या आवारात चौघा जणांनी सुऱ्याने हल्ला केला. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान चार हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.

  राज्यभर गाजलेल्या कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली होती. या खटल्याची सुनावणी येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुरू आहे. शुक्रवारी वकिलांच्या संपामुळे सुनावणी होऊ शकली नाही. शनिवारी या प्रकरणाची नियोजित सुनावणी होणार होती. या प्रकरणातील आरोपींना पोलिस कडक बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यासाठी दुपारी एकच्या सुमारास घेऊन आले.

  न्यायालयाच्या आवारात या आरोपींवर हल्ला झाला. या प्रकरणातील मुख्य आरोपी पप्पू िशंदे याच्या मानेवर धारदार शस्त्र घालण्याचा प्रयत्न हल्लेखाेर करत असताना बंदोबस्तावरील पोलिस कॉन्स्टेबल रवी टकले यांनी हा हल्ला रोखला. यात टकले यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी या प्रकरणी हल्लेखारे राजेंद्र जराड, बाबूराव वाळेकर, अमोल खुणे, गणेश खुणे यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली. 

  ताब्यात घेतलेले चौघेही शिवबा संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे कळते. काही जण बीड जिल्ह्यातील गेवराई येथील रहिवाशी आहेत. तर जराड हा जालन्याचा आहे. पोलिसांनी आरोपींकडून चार सत्तूर, दोन कोयते जप्त केले आहेत. या आधीही कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर न्यायालयाच्या आवारात दोन वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. आरोपींवर हल्ला करणाऱ्यां विरोधात कँप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

  शुक्रवारी सुनावणीच्या आधी कोपर्डी प्रकरणातील आरोपी त्यांच्या नातेवाईकांमध्ये हास्यविनोद सुरू होते. ते पाहून शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राग आला त्यांनी शनिवारी सधी साधून हल्ला केल्याचे पोलिसांना सांगितले. हल्लेखोरांवर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, भारतीय हत्यार कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रविवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad