728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

रेखामावशी... अ वन वुमन आर्मी !


अहमदनगर । DNA Live24 -

रेखा दिलीप आचार्य ! 
माझी मावशी. 
माझ्यासाठी एक प्रेरणा..!

माझ्या लाडक्या मावशीचा आज वाढदिवस. या लाडक्या मावशीसाठी माझ्या मनात एक खास स्थान आहे. आणि त्याला कारणही तसे स्पेशलच आहे. कारण ती खरंचंच ग्रेट आहे. वयाच्या 30-32 व्या वर्षी आमचे काका एका अपघातातमध्ये देवाघरी गेले. त्यावेळी मावशीच्या पदरात माझी दोन लहान भावंड होती. त्यावेळी त्यांची परिस्थितीही बिकटच होती. अक्षरश: खाण्या-पिण्याचे देखील हाल होते.

लहान मुलांचे शिक्षण, घरभाडे, अन् कुटुंबाचा कणाच मोडून पडल्यामुळे उपजीविका करणे अतिशय कठीण होते. नियतीने वाढून ठेवलेल्या या दुर्भाग्यापुढे कुठलीही स्त्री हरली असती, कोलमडून गेली असती. पण रेखामावशीने हार न मानता परिस्थितीचा सामना केला. खरं तर एकट्या स्त्रीला आपल्या समाजात राहणे किती कठीण आहे, हे सर्वांना माहित आहे. पण, मावशीने मुलांच्या सुखासाठी परिस्थितीशी दोन हात केले.

मावशी सुगरण असल्यामुळे आधीपासूनच वेगवेगळ्या डिशेज बनवण्यात तरबेज होती. या कौशल्यालाच तिने नंतर व्यवसायाचं स्वरूप दिले. मग सणाला, कार्यक्रमांना लोकांच्या घरी स्वयंपाक करून देऊ लागली.. मावशी स्वावलंबी झाली. तिने कोणापुढेही हात पसरले नाहीत. काही वर्षात तिने मुलांना मोठं करून फक्त पायावर उभेच नाही केलं, तर तिचे स्वतःचे हक्काचे घरही उभे केले. तिचा हा प्रवासही खडतर होता.

प्रतिकुल परिस्थितीत नातेवाईक साथ देऊन देवून तरी किती दिवस मदत करतात ? पण तिने कोणावर अवलंबून न राहता स्वतःचा मार्ग स्वतः निवडला. ती स्वतःच कर्तबगारीने पुरुष झाली.. खरं तर आपल्या आजूबाजूलाही कितीतरी महिला आहेत, ज्या कोणावर डिपेंड न राहता स्वतःच सर्व करतात. कुटुंबाचा गाडा ओढणाऱ्याही महिला आहेत. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत अशा स्रीयांची खूप उदाहरणं आहेत.

एखाद्या व्यक्तीने एकट्याने परिस्थितीशी दोन हात केले तर आपण त्याला वन मॅन आर्मी असे संबोधतो. माझी रेखा मावशीही अश्शीच आहे. She is a one women army..! शिक्षण घेऊन ऑफिसला जणाऱ्या महिलांचा आपण नेहमीच आदर सत्कार करत आलोय. शिक्षण नसताना घराबाहेर पडून साक्षर झालेल्या महिला पण किती ग्रेट असतांत ना ?

म्हणूनच मला रेखा मावशीचा प्रचंड अभिमान आहे. आणि आजच्या ह्या गोड दिवशी माझ्याकडून तिला खूप खूप शुभेच्छा..! यु आर माय रियल इन्स्पिरेशन मावशी !

हॅप्पी बर्थडे ... !

 - प्रियंका जोशी, अहमदनगर
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: रेखामावशी... अ वन वुमन आर्मी ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24