Header Ads

 • Breaking News

  नगर जिल्ह्यात तातडीचे भारनियमन !

  नगर l DNA Live24 - विदर्भातील विद्युतनिर्मिती करणारे दोन विद्युत संच बंद पडल्याने महावितरण कंपनीने शहरासह उर्वरित जिल्ह्यातही गेल्या चार दिवसांपासून तातडीचे भारनियमन सुरु केले आहे. नगर शहरात ऐन दुपारच्यावेळी चार तास बत्ती गुल होत आहे. अचानक होत असलेल्या भारनियमनाचा अनेकांना फटका बसत आहे.

  २७ मार्च रोजी सकाळी ११ च्या सुमारास महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून जिल्हा कार्यालयाला फोन आला. त्यात तातडीचे भारनियमन करण्यास सांगण्यात आले. विदर्भातील दोन विद्युत संच बंद पडल्याने मोठ्या शहरासाठी विजेला प्राधान्य देण्यात येत असल्याने, संपूर्ण जिल्हाभर वीज बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला.

  गेल्या दोन आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. दिवसा कडाक्याच्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना, रात्रीच्या वेळेसही उकाडा जाणवत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे सर्वत्र फॅन, कुलर तर काही ठिकाणी एसीचा वापर वाढला आहे. उन्हाच्या जास्त तीव्रतेमुळे शीतपेयांना मागणी वाढली असून, ठिकठिकाणी शीतपेयांच्या गाड्या दिसू लागल्या आहेत. शीतपेयांसाठी लागणारा बर्फ बनविण्यासाठी बर्फाच्या कंपन्यांमध्ये विजेची मागणी वाढली आहे.

  अशी परिस्थिती असताना महावितरण कंपनीने जिल्हाभर एकाच वेळी भारनियमन सुरु केले आहे. ऐन कामाच्या वेळेस भारनियमन झाल्याने अनेक सरकारी कार्यालयातील कामे दुपारी बंद पडत आहेत. वाढलेले ऊन आणि त्यात लाईट गुल त्यामुळे कर्मचारी वर्ग हैराण होत आहे.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad