728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

श्रीराम चौकात गावठी पिस्तुलातून युवकावर गोळीबार

अहमदनगर । DNA Live24 - मोबाईल शाॅपी चालक युवकावर गावठी पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात युवक जखमी झाला. ही घटना शुक्रवारी रात्री पावणे आठ वाजता पाईपलाईन रोडवरील हॉटेल सागरसमोर घडली. गोळीबार करणारा हल्लेखोर युवक घटनास्थळाहून पसार झाला असून पोलिस त्याच्या मागावर आहेत. ज्या पिस्तुलातून गोळीबार झाला, ते गावठी पिस्तुल पोलिसांनी जप्त केले आहे.

भारत जाधव (मूळ रा. भेंडे, ता. नेवासे, हल्ली नगर) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या खांद्याला गोळी लागली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. भारत त्याच्या मोबाईल शॉपीमध्ये बसलेला असताना योगेश कुसळकर (मूळ रा. भानसहिवरे, ता. नेवासे) हा तेथे आला. त्यांच्या आधी बाचाबाची झाली. नंतर योगेशने त्याच्याजवळच्या पिस्तुलातून योगेशवर गोळीबार केला.

गोळीबाराचा आवाज होताच परिसरात पळापळ झाली. सहायक पोलिस अधीक्षक तथा शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक चिन्मय पंडित तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण वाखारे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी आले. झटपटीत घटनास्थळी पडलेले पिस्तुल पोलिसांनी जप्त केले आहे. आरोपीचे नाव निष्पन्न झाल्यामुळे एक पथक आरोपीच्या मागावर रवाना करण्यात आले आहे.

या घटनेमुळे पाईपलाईन रोड परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. भारत व योगेश हे मित्र आहेत. मात्र योगेशच्या बहिणीसोबत भारतने बोलल्याचा राग आल्यामुळे हा प्रकार घडला, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवलेली नव्हती. पोलिसांनी पाईपलाईन परिसरात मात्र बंदोबस्त तैनात केला होता.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: श्रीराम चौकात गावठी पिस्तुलातून युवकावर गोळीबार Rating: 5 Reviewed By: DNA Live24