Header Ads

 • Breaking News

  जिओची 'Dhan Dhana Dhan'ऑफर, यूजर्सला मिळणार 168GB डेटा!


  मुंबई l DNA Live24-
  जिओनं समर सरप्राईज ऑफर मागे घेतल्यानंतर जिओनं आज (मंगळवारी) एका नव्या नव्या ऑफरची घोषणा केली आहे. (Dhan Dhana Dhan) ‘धन धना धन’ ही नवी ऑफर जिओ आणली आहे. ही ऑफर 309 आणि 509 रुपयांच्या रिचार्जवर मिळणार आहे.

  कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, जिओचे प्राईम मेंबर्सला 309 रुपयांच्या रिचार्जवर 84 जीबी डेटा मिळेल. ही ऑफर 84 दिवसांसाठी वैध असणार आहे. त्याशिवाय 509 रुपयांच्या रिचार्ज प्लानवर प्राईम यूजर्सला तब्बल 168 जीबी डेटा मिळणार आहे. याची वॅलिडिटी देखील 84 दिवस असणार आहे. याआधी कंपनीनं 549 रुपयात 56 जीबी डेटा 28 दिवसांसाठी अशी ऑफर आणली होती.

  309 रुपयांच्या प्लानवर यूजर्सला दररोज 1 जीबी डेटा मिळणार आहे. तर 509 रुपयांच्या प्लानवर दररोज 2 जीबी डेटा मिळेल.


  Post Top Ad

  Post Bottom Ad