728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

कर्जमाफीसाठी महाराष्ट्र भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा एल्गार

अहमदनगर । DNA Live24 - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा, डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील शेतकरी एक जूनला संपावर जाणार आहेत. या पार्‍वभूमीवर महाराष्ट्र भूमिपुत्र शेतकरी संघटनेची जिल्हास्तरीय बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी नगर येथील शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल देठे, उपाध्यक्ष असिफ शेख, जिल्हा संपर्क प्रमुख तुकाराम हासे उपस्थित होते. या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत चालल्या असून सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर गंभीर नसल्यानेच यापुढे शेतकऱ्यांना संघटीत करून सरकारविरोधात व्यापक संघर्ष उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एक जुनचा शेतकऱ्यांचा संप व्यापक व यशस्वी करण्याचा मानस आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी जागृती यात्रा काढण्यात येईल. संघटना यासाठी पुढाकार घेईल तसेच 1 मे च्या ग्रामसभेत सर्वांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास एक जूनला संपावर जाण्यासाठीचा ठराव घेण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले. या ठरावाच्या प्रती सामुहिक रित्या 2 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

बैठकित संघटनेच्या विविध पदांवर कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकारी याप्रमाणे- जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर गायके, अशोक आंधळे, जिल्हा संघटक राधुजी राऊत, सचिव रावसाहेब खतोडे, प्रवक्ता संदिप मचे, राहुरी तालुकाध्यक्ष सचिन मोरे, कार्याध्यक्ष आकाश उदागे, संघटक रविंद्र शेळके, पाथर्डी तालुकाध्यक्ष गणेश सुपेकर, मुळा खोरे अध्यक्ष चेतन साबळे, पारनेर उपाध्यक्ष गोकुळ ठुबे, राहुरी उपाध्यक्ष भुषण हारदे, श्रीरामपूर अध्यक्ष शिवनाथ औताडे, सचिव संतोष निघुट.

संघटक किशोर बनसोडे आदिंची निवड करून नियुक्तिपत्र अध्यक्ष वाडेकर, जिल्हाध्यक्ष देठे पाटील व शेख यांच्या हस्ते देण्यात आले. या बैठकीला खजिनदार निलेश तळेकर, गणेश चौधरी, सचिन सैद, नंदू साळवे, रोहिदास धुमाळ, संदिप जाधव, संतोष गागरे, राजु खतोडे, अक्षय गवळी, प्रविण पवार, संतोष कोरडे, किरण धात्रक, विष्णु भसाळे, सोमनाथ भसाळे, राजेंद्र औताडे, आत्माराम औताडे, शेखर कोल्हे, अशोक भसाळे, संदिप शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: कर्जमाफीसाठी महाराष्ट्र भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा एल्गार Rating: 5 Reviewed By: DNA Live24