728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

शिक्षकांच्या प्रश्‍नासंदर्भात आमदार तांबे यांच्याशी चर्चा

अहमदनगर । DNA Live24 - जिल्हा ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघटनेच्या वतीने नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याशी शिक्षकांच्या विविध प्रश्‍नासंदर्भात चर्चा करण्यात आली. शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू होण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. नाशिक पदवीधर मतदार संघामध्ये तिसऱ्यांदार बहुमताने निवडून आल्याबद्दल आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा जिल्हा ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, शिक्षक नेते भाऊसाहेब कचरे, संजय शिंदे, सोपान कदम, प्रा. उत्तम गागरे, अमित खामकर, अमोल कांडेकर, संजय शिंदे, विनायक कोके आदि उपस्थित होते. यावेळी  प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रावसाहेब रोहोकले यांचाही सत्कार करण्यात आला. विधाते यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकित शिक्षकांच्या विविध प्रश्‍नावर चर्चा झाली.

आमदार तांबे यांनी विनाअनुदानित व अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रश्‍नासंदर्भात शासनस्तरावर झालेल्या चर्चेची माहिती दिली. सन 2012 पासून कनिष्ठ महाविद्यालयाच्या थांबलेल्या शिक्षक मान्यतेबाबत बैठकित चर्चा करण्यात आली. तसेच 20 टक्के अनुदानित शैक्षणिक संस्थांना लवकरच अनुदान देण्याबाबत शासनास्तरावर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. अमोल कांडेकर यांनी सर्वांचे आभार मानले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: शिक्षकांच्या प्रश्‍नासंदर्भात आमदार तांबे यांच्याशी चर्चा Rating: 5 Reviewed By: DNA Live24