728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

नगरमध्ये वाहनांमधून दारुची अवैध वाहतूक

अहमदनगर । DNA Live24 - सहायक पोलिस अधीक्षक तथा शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वाखाली शहरातील अवैध दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी छापे टाकले. या छाप्यांमध्ये एकूण १० लाख ९ हजार ४३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी कोतवाली व तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलिस नाईक सचिन जाधव, अमित महाजन, रामदास सोनवणे, दीपक रोहकले, याकूब सय्यद, गिरवले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सर्जेपुरा परिसरात बोलेरो (एमएच 23 एपी 2878)  या वाहनात देशी विदेशी दारू अवैधरित्या विक्री साठि घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली असता 41 हजार 388 रुपयांची देशी विदेशी दारू व 3 लाख रुपयांची बोलेरो गाड़ी जप्त करण्यात आली. याप्रकरणी आरोपी दत्तात्रय   जाधव व वसंत घावडे (रा. आष्टी बीड) यांच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चितळे रोड येथे पॅगो रिक्षा ताब्यात घेऊन 13 हजार 680 रुपयांची देशी विदेशी दारू व 1 लाख २५ हजार रुपयांची रिक्षा जप्त करण्या आली. याप्रकरणी आरोपी महेश बनसोडे व रवि खैरनार यांच्याविरुद्ध तोफखान्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सर्जेपुरा येथे विना नंबरची एव्हेटर होंडा दुचाकी ताब्यात घेऊन 9 हजार 300 रुपयांची देशी विदेशी दारू व ४० हजार रुपयांची गाडी जप्त करण्यात आली. याप्रकरणी विजय हनुमंत थोरवे याला अटक करण्यात आली.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: नगरमध्ये वाहनांमधून दारुची अवैध वाहतूक Rating: 5 Reviewed By: DNA Live24