Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

शनिवार, २९ एप्रिल, २०१७

पिण्याच्या पाण्यासाठी अडवला नगर-आैरंगाबाद महामार्ग


नेवासा । DNA Live24 - नेवासे तालुक्यातील शिंगवे तुकाई फाटा येथे शिंगवे तुकाई, मांडे-मोरगव्हाण, लोहारवाडी, राजेगाव, चांदा गावच्या ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी रस्ता रोको आंदोलन केले. क्रांतीकारी शेतकरी पक्षानेही यामध्ये सहभाग नोंदवला. या गावांसाठी असलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून 20 कोटी रू खर्च करून उभारण्यात आलेली पाणी योजना बंद अवस्थेत आहेत. ही योजना सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

भर उन्हाळ्यात 5 गावातील लोकांची पाण्यासाठी पायपीट होत आहे. शासनाचे अडमुठे धोरण, विद्युत वितरण कंपनीचा मनमानी कारभार या निषेधार्थ शिंगवे तुकाईसह 5 गावातील शेतकरी, ग्रामस्थांनी शिंगवे तुकाई फाट्यावर आंदोलन केले. याप्रसंगी शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. याप्रसंगी माजी सभापती कारभारी जावळे, जिल्हा  परिषद सदस्य अनिल अडसुरे, सरपंच सतिश थोरात, पांडुरंग होंडे आदींनी महावितरण कंपनी तसेच प्रशासनाच्या मनमानी धोरणाच्या विरोधात मत व्यक्त केले.

पाणी योजना कार्यान्वित केली नाही, तर भव्य रास्ता रोकोचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. याप्रसंगी संजय भगत, शशिकांत वाघ, रशिद शेख, सरपंच इंदूबाई गंगाधर विधाटे, बाप्पु आव्हाड, आल्लु इनामदार, शिवाजी पुंड, अज्जु शेख, पप्पू चौधरी आदींसह 5 गावातील शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. सोनई पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण शिंदे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. नायब तहसीलदार पाठक, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले.

या अांदोलनात सचिन आव्हाड, गंगाधर विधाटे, शिवाजी पुंड, संभाजी पवार, आदिनाथ बारहाते, गणेश पुंड, कृष्णा विधाटे, गणेश चोथे, अंजू शेख, विजय पवार, गणेश थोरात, ज्ञानेश्वर पुंड, गोपाल दरंदले, अनु थोरात, संजय डहाळे, निलेश पवार, संदीप गायकवाड, संकेत पवार, सोनल गायकवाड, राहुल होंडे, अविनाश आढागळे, पांडुरंग होंडे, अनिल होंडे, अविनाश विदरकर, सलिम शिंदे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनामुळे वाहनचालकांचे मात्र हाल झाले.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages