Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

सोमवार, २४ एप्रिल, २०१७

प्रामाणिक भावनेने कार्य केल्यास यश निश्‍चित - अनिस शेख


अहमदनगर । DNA Live24 - ज्या पद्धतीने निसर्गातील विविध वस्तू या जगात काही ना काही मोलाचे समजोपयोगी कार्य नैसर्गिकरित्या करत असते व त्या मोबदल्यात कुठलीही अपेक्षा बाळगत नाही. जसे एखादे मोठे झाड आपल्याला सावली देते, ऑक्सिजन देते, फळ, फुल देते तसेच मनुष्यजन्मी समाजाला आपण काही देणे लागतो, या प्रामाणिक भावनेतून आपण काम केल्यास, निश्‍चितच चांगले यश प्राप्त होते, असे प्रतिपादन मिनर्व्हा इन्फ्राचे प्रमुख अनिस शेख यांनी केले.

अहमदनगर सोशल क्लबच्यावतीने शहीद स्वलेह जावेद बकाली यांच्या शहिद दिनानिमित्त सिव्हील हॉस्पिटल येथे आयोजित अन्नदानप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना अनिस शेख बोलत होते. याप्रसंगी रोटरी क्लब मिडटाऊनचे अध्यक्ष माने, रफिक कादर शेख, सय्यद अफजल पिरजादे, अनजर खान, सय्यद शाह फैसाल आदि यावेळी उपस्थित होते.

अहमदनगर सोशल क्लबचे अध्यक्ष नईम सरदार म्हणाले, हैद्राबाद येथील समाजरत्न अजहर मकसुसी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेल्या मोफत अन्नदान वाटप कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या पार पाडत आहोत. समाजातील विविध नागरिकांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. समाजातील दानशूरांना विनंती की त्यांनी या पुण्याच्या अन्नदान वाटप कार्यक्रमास हातभार लावावा व अहमदनगर सोशल क्लबला सहकार्य करावे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजिनिअर इम्रान खान यांनी केले. तर आभार मुबिन शेख यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहमदनगर सोशल क्लबचे प्रमुख नईम सरदार, आबीद दुलेखान, श्रीमती माने, आदित्य वडवणीकर, सय्यद शफाकत, कासमभाई केबलवाले, आफताब शेख, शब्बीर सय्यद, शेख फिरोज हसन, राजूभाई, जावेद मास्टर आदिंनी परिश्रम घेतले.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages