728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

बीबीएच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास : प्राचार्य झावरे

नगर l DNA Live24 - कौशल्य विकास, व्यक्तिमत्व विकासातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या बीबीए विभागात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याचे प्रतिपादन न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे यांनी केले.

बीबीए विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विभागप्रमुख प्रा. मंगेश वाघमारे, प्रा. डॉ. सतीश जगताप, प्रा. राहुल थोरात, कॉमर्स विभागाचे जेष्ठ प्रा. सुनील काकडे, प्रा. डी. इ. सुपेकर, प्रा. ऐ. एम. सोनावणे, परीक्षा विभागप्रमुख मच्छिन्द्र अमृते आदी उपस्थित होते.

झावरे म्हणाले कि, विद्यार्थ्यांना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व औद्योगिक क्षेत्रात काम करण्याच्या भरपूर संधी आहेत. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला पाहिजे. काळासोबत चालण्यासाठी भविष्यात प्राध्यापकांनीही काल सुसंगत राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

बीबीएच्या ५ विद्यार्थ्यांची पुण्यातील टीसीएस तसेच १० विद्यार्थ्यांची डब्ल्यू. एन.एस. कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली. तसेच जिल्हास्तरीय मॅनेजमेंट स्पर्धांमध्येही बीबीएच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले. त्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य झावरे यांनी गौरव केला. 

यावेळी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. विद्यार्थ्यांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रास्ताविक प्रा. वाघमारे यांनी केले. प्रा. डॉ. सतीश जगताप यांनी आभार मानले. प्रा. काकडे, सोनावणे व अमृते यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: बीबीएच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास : प्राचार्य झावरे Rating: 5 Reviewed By: DNA Live24