Header Ads

 • Breaking News

  ‘शब्दगंध’ हे वंचितांचे हक्काचे विचारपीठ - डॉ. अशोक शिंदे  अहमदनगर । DNA Live24 - शब्दगंध साहित्यिक परिषद व शब्दगंध साहित्य संमेलन हे राज्यातील ग्रामिण भागातील वंचित साहित्यिक व कलावंताना व्यक्त होण्यासाठी प्राधान्य क्रमाने संधी देणारे हक्काचे विचारपीठ आहे, प्रतिपादन 12 व्या राज्यस्तरी शब्दगंध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी केले. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने शनिशिंगणापूर येथे आयोजित 12 व्या संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन व शब्दगंध प्रबोधन पुरस्कार वितरण संमारभात ते बोलत होते.

  सावेडीतील कोहिनुर मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास प्राचार्य शिवाजी देवढे, कवी चंद्रकांत पावले, लेखिका मेघा काळे, साहित्यिक डॉ. संजय कळमकर, अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. डॉ. अशोक शिंदे म्हणाले, ज्या नेवासा तालुक्यात माझा जन्म, शिक्षण व 38 वर्षे सेवा झाली त्याच तालुक्यात शनिशिंगणापुर येथे झालेल्या 12 व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविण्याची संधी मला मिळाली, याचा अभिमान आहे.

  प्राचार्य देवढे म्हणाले, शब्दगंधने आपल्या साहित्यिक वाटचालीचे एक तप पुर्ण केले आहे. या 12 वर्षाच्या वाटचाली अनेक अडचणीकर मात करुन शब्दगंध साहित्यिक चळवळ राज्यात विस्तारली. रांगेत नसलेल्या अनेक नवोदित साहित्यिक व कलावंताना शब्दगंधने संधी दिली. राज्यात त्यांची नवी ओळख निर्माण केली. सुभाष लांडे म्हणाले, शब्दगंध चळवळीने साहित्यिक क्षेत्रात विशेष लोकमान्यता मिळाली, याचा प्रत्यय येतो. यावेळी मेघा काळे व चंद्रकांत पालवे यांचीही भाषणे झाली.

  संमेलनाध्यक्ष अशोक शिंदे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘शब्दगंध’ च्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. आपल्या भारुड या पारंपारिक लोककलेव्दारे राज्यभर प्रबोधन करणाऱ्या भारुड सम्राट हमीद सय्यद यांना राज्यस्तरीय शब्दगंध प्रबोधन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना हमीद सय्यद म्हणाले, हा राज्यस्तरीय पुरस्कार माझ्या कला कारकिर्दीला स्मृति, प्रेरणा व बळ देणारा ठरणार आहे.

  राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून इयत्ता पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांना शाहिरी या लोककलेचे प्रशिक्षण व गुणदान करण्यासाठी महाराष्ट्र कलापथक संच या संस्थेची निवड झाल्याबद्दल शाहिर भारत गाडेकर यांचा विशेष गौरव करण्यात आला. सुनिल गोसावी यांनी प्रास्तविक केले. शर्मिला गोसावी यांनी सुत्रसंचालन केले. भगवान राऊत यांनी आभार मानले.

  या कार्यक्रमास पांडव पुरी, शिरिष जाधव, कृष्णकांत लोणे, विनायक पवळे, ऋता ठाकूर प्रा. तु. द.गोंदकर, प्रा. प्रशांत म्हस्के, हर्षल आगळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बबनराव गिरी, भारत गाडेकर, ऋषिकेश राऊत, भाग्यश्री राऊत, दिशा गोसावी, हर्षाली गिरी, आदींनी परिश्रम घेतले.

  Post Top Ad

  Post Bottom Ad