728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

स्नेहालयातील मुलांनी घेतला क्रिकेटचा आनंद

अहमदनगर । DNA Live24 - आदर्श व्यापारी मंडळ व मॉर्निंग सीसी क्लब आयोजित भगवान महाविर चषक सकल जैन टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट  स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या  सुरुवातीस दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या समवेत स्नेहालायातील मुलांना सहभागी करून हातात तिरंगा झेंडा घेत उपस्थित प्रेक्षकांना अभिवादन करण्यात आले.

नमो ९९ व क्वॅालिटी वॉरीयर्स यांच्यात झालेल्या अंतिम सामना पाहण्यासाठी सामाजिक जाणीवेतून स्नेहालायातील मुलांची खास बैठक व्यवस्था करण्यात आली होती. डेनाईट क्रिकेटचा अनुभव व आनंद घेत या मुलांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत जल्लोष केला, अशी माहिती संजय चोपडा यांनी दिली.

दौंडच्या नगराध्यक्षा शितलताई कटारिया, पुणे मनपाचे नगरसेवक व मर्चंट चेम्बरचे अध्यक्ष प्रविण चोरबेले, यांच्या हस्ते स्नेहालायातील उपस्थित मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी राजेंद्र चोपडा, अमित मुथा, चेतन बोगावत, उपस्थित होते. प्रेक्षकांनी  या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल स्पर्धेचे संयोजक आदर्श व्यापारी मंडळ व मॉर्निंग सीसी क्लबचे अभिनंदन केले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: स्नेहालयातील मुलांनी घेतला क्रिकेटचा आनंद Rating: 5 Reviewed By: DNA Live24