728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

कड़क उन्हाळ्यात मुलांना पोहोन्याची पर्वनी


नेवासे l DNA Live24 - वाढत चाललेल्या उन्हाचा कडाका सहन करण्यासाठी पाण्याची गरज आहे. तहान भागवण्याबरोबर खेळण्यासाठी पोहण्यासाठी पाणी असेल तर, खरच स्वर्ग 2 बोटेवर आहे असे सुख असेल.

या वर्षी निसर्गाच्या कृपेने ऐन उन्हाळ्यात प्रवरामाईला पाणी आहे . मध्यमेश्वर बंधारा परीसरातील शेतीसाठी वरदान आहे. त्या मुळे नदीला भरपूर पाणी आहे. नेवासा शहरातून वहाणारी प्रवरामाई गेल्या अनेक वर्ष कोरडी होती. पण  यावेळी उन्हाळ्यात पाणी असल्याने पोहव्याचा आनंद लुटण्या-यासाठी पर्वणीच आहे. ही पर्वणीसाधण्याठी पोहणारे तरूण भरदुपारी घाटावरती  गर्दी करतात.

त्याही पेक्षाही नेवासा येथे गणपतीघाटावर हरीभाऊ पंडुरे यांनी नौकाविहारा बरोबर लहान मुलांना पोहायला शिकवण्यास सुरूवात केली आह्रे. त्यामुळे गणपती घाटावर पोहवणा-या लहान मुले - मुलीं बिनधास्त पणे पाण्यात उड्या मारत आहे.

प्रथम गावरान पद्धतीने शिकवत असताना मुले घाबरत होती. पण आता अद्ययावत पद्धतीचे पोहन्याचे जॅकेट उपलब्ध झालेले असल्याने  लहान मुलांची याकडे ओढ निर्माण होत आहे. लाईफ जॅकेट घालून एका वेळी अनेक जण पोहोतात आणि पाण्यावर बिनधास्त पणे झोपून पोहवण्याचा आनंद घेतात.  थोड्याच दिवसात ही मुले व  मुली देखील नदी मध्ये जॅकेट विना.पोहण्याचा आनंद घेतात या मुला मुली मध्ये पोहण्यासाठी 5 वर्षाची एक लहान मुलगी येत आहे आणि तिही पोहण्याचा आनंद घेते...

लाईफ जॅकेट आणल्यामुळे आता पालकही निश्चितपणाणे आपल्या मुलांना मुलींना पोहण्याचे शिकण्यासाठी पाठवितात असल्याने या वेळचा उन्हाळा नेवासा शहरातील लहान मुलांना पर्वणी ठरत आहे.
 नौका विहार व पोहण्यासाठी चांगले पाणी योग्य जागा तसेच आता पोहायला शिकवायला पट्टीचा पोहणारा शिक्षकही असल्याने गणपती घाटावर सकाळीच नव्हेतर दुपारीच जास्त गर्दी असते.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: कड़क उन्हाळ्यात मुलांना पोहोन्याची पर्वनी Rating: 5 Reviewed By: DNA Live24