Header Ads

 • Breaking News

  यशवंत सामाजिक प्रतिष्ठानमुळे नेवाशात सर्वाधिक मोफत वाचनालये


  नेवासे । DNA Live24 - ग्रामीणन युवकांना भविष्यकाळात स्पर्धेच्या युगात स्थान मिळण्यासाठी ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी यशवंत समाजिक प्रतिष्ठानने पुढाकार घेतला. ग्रंथ संपदेची गंगा गावोगाव पोहोचवत सर्वगुण संपन्न युवा पिढी घडवण्याचा संकल्पपूर्तीला आता यश मिळत आहे. नेवासे तालुक्यातील ६२ गावांत वाचन संस्कृती रुजवण्यासाठी यशवंत प्रतिष्ठानने पुढाकार घेतला. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक मोफत सार्वजनिक वाचनालये असण्याचा मान नेवासे तालुक्याला यशवंत प्रतिष्ठानच्या कार्यामुळे मिळाला आहे.

  यशवंत प्रतिष्ठानने सर्वप्रथम सोनईत मोफत यशवंत वाचनालय सुरू केले. गेल्या वर्षी १२ मेला सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासेतील संत ज्ञानेश्वर मंदिराच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात यशवंत प्रतिष्ठानने तालुक्यात गाव तेथे सार्वजनिक वाचनालय असा संकल्प केला. त्यामुळे तालुक्यात ज्या गावांत ग्रंथालये नाहीत, अशा गावांत पहिल्या टप्प्यात ५१ त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ११ अशा एकूण ३२ गावांत मोफत सार्वजनिक वाचनालये उघडण्यात आले.

  आजवर या प्रतिष्ठानने तालुक्यात ५० हजारहून अधिक पुस्तकांचे वाटप ग्रंथालयांना केलेे आहे. गेल्या बारा वर्षांपासून दरवर्षी ऋतुरंग या उत्कृष्ट दिवाळी अंकाच्या १५०० प्रती मोफत वाटल्या जातात. यशवंत वाचनालय परिसरात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत पुस्तके देऊनच केले जात असते. लग्न समारंभात सत्कार सोहळ्याला फाटा देऊन वाचनालयासाठी ते देण्याच्या यशवंत प्रतिष्ठानने केलेल्या आवाहनाला तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा युवा नेते प्रशांतभाऊ गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेने चळवळीचे स्वरुप घेतले आहे.
  जपली सामाजिक बांधिलकी - ज्या समाजात आपण घडतो, राहतो, त्या समाजाचं आपल्यावर ऋण असते. म्हणून त्या समाजासाठी कृतज्ञता भावाने काहीतरी करत राहण हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. माेफत वाचनालये सुरू करून वाचक संस्कृती रुजवण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीतून सुरू केला. त्याला विधायक स्वरुप प्राप्त झाले असून नेवासे तालुक्यात वाचनसंस्कृती रुजत आहे.- प्रशांत गडाख, अध्यक्ष, यशवंत सामाजिक प्रतिष्ठान

  Post Top Ad

  Post Bottom Ad