Header Ads

 • Breaking News

  आयपीएल सामन्यावर सट्टा लावणारा जेरबंद

  अहमदनगर । DNA Live24 - बुधवारी रात्री सुरू असलेल्या आयपील स्पर्धेतील दिल्ली विरुद्ध हैदराबाद सामन्यावर सट्टा लावणाऱ्या युवकाला पोलिसांनी जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार राजकुमार हिंगोले यांच्या पथकाने केडगावात ही कारवाई केली. सोनू नामदेव घेंबुड (वय २८, रा. घेंबूड मळा, केडगाव नगर) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

  त्याच्या ताब्यातून पोलिसांनी दोन मोबाईल हँडसेट, इतर साहित्य असा एकूण ५७ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. फौजदार हिंगोले यांच्यासह पोलिस हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, उमेश खेडकर, संदीपआण्णा पवार, पोलिस कॉन्स्टेबल राहुल हुसळे, रोहिदास नवगिरे, शेजवळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली. घेंबूड याच्यासह आणखी एका जणाविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात मुंबई जुगार कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास कोतवाली पोलिस करीत आहेत.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad