728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

एमआयडीसीत रस्तालूट करणारे आरोपी जेरबंद


अहमदनगर । DNA Live24 - एमआयडीसी हद्दीत रस्तालूट करणाऱ्या चार युवकांना एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण व सहकाऱ्यांनी कामगारांसारखे वेशांतर करुन रंगेहात पकडले. ही धाडसी कामगिरी सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सह्याद्री चौकात करण्यात आली. पकडलेल्या युवकांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.

ओंकार नंदू गायकवाड (वय १८, रा. मोरया पार्क, नगर) व राहुल जगन्नाथ रनवरे (वय १८, रा. तलाठी कार्यालयामागे, नवनागापूर ) अशी सज्ञान आरोपींची नावे आहेत. तर त्यांच्यासोबत दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले. एमआयडीसीचे सहायक निरीक्षक विनोद चव्हाण व सहकारी सोमवारी रात्री परिसरात दरोडा प्रतिबंधक गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली.

एमआयडीसी हद्दीमध्ये कामगारांच्या वेशात येऊन लुटमार करण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे सहायक निरीक्षक चव्हाण यांनी तीन वेगवेगळी पोलिस पथके तैनात केलेली आहेत. पोलिस उपनिरीक्षक शिवाजी नागवे, पोलिस नाईक प्रविण खंडागळे यांचे एक पथक सह्याद्री चौकात गस्तीवर होते. पोलिस साध्या वेशात रस्त्याने पायी जात असताना समोरुन दोन मोटारसायकली त्यांच्याजवळ आल्या.

मोटारसायकलींच्या नंबर प्लेट कापडाने बांधलेल्या होत्या. चोरट्यांनी गाड़्या रस्त्याच्या बाजूला लावल्या व साध्या वेशातील पोलिसांना अडवले. तुम्हारे पासके मोबाईल और पैसे निकालो, असे म्हणत धमकावले. पोलिसांनी प्रसंगावधान राखून चोरट्यांना पकडण्याचा, तर चोरट्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी सहायक निरीक्षक चव्हाण व सहकारी तेथे अाले. सर्वांनी मिळून चारही चोरट्यांना पकडले.

युवकांनी मोटारसायकलींच्या नंबर प्लेट का झाकल्या होत्या, याचे समाधानकारक उत्तर दिले नाही. हिरो होंडा स्प्लेंडर व होंडा डिओ, अशा दोन दुचाक्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. युवकांकडे अधिक चौकशी सुरू असून त्यांच्याकडून ऱस्तालुटीचे काही प्रकार उघडकीस येण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तवली आहे. सहायक पाेलिस निरीक्षक चव्हाण व सहकाऱ्यांच्या कामगिरीचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: एमआयडीसीत रस्तालूट करणारे आरोपी जेरबंद Rating: 5 Reviewed By: DNA Live24