Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

बुधवार, ३ मे, २०१७

पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

अहमदनगर । DNA Live24 - पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून, तिला जाळून खून केल्याप्रकरणी दोषी ठरवून एका व्यक्तीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दत्तात्रय अर्जुन भोसले (वय ३४, रा. जातेगाव, ता. जामखेड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांनी बुधवारी हा निकाल सुनावला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता केदार केसकर यांनी काम पाहिले.

आरोपी दत्तात्रय भोसले हा २ जानेवारी २०१५ रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घरात त्याच्या मुलाला पट्ट्याने मारहाण करीत होता. मुलाला मारु नका, असे म्हणत दत्तात्रयची पत्नी सुवर्णा मध्ये पडली. तिचा राग आल्यामुळे दत्तात्रयने घरातील रॉकेल सुवर्णाच्या  अंगावर टाकून तिला पेटवून दिले. सुवर्णाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिचा दीर प्रल्हाद भोसले धावत आला.

त्यांनी सुवर्णाला विझवून तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. तेथे तिचे प्राणोत्क्रमण झाले. त्यामुळे याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात दत्तात्रयविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी दत्तात्रयला अटक करुन गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात खटला दाखल केला. या गुन्ह्यात अटक झाल्यापासून आरोपी दत्तात्रय हा तुरुंगातच होता.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. मयत सुवर्णाचा मृत्यूपूर्व जबाब, तिचा मुलगा आदित्य व मुलगी दिव्या यांच्या साक्षी या खटल्यात महत्वाच्या ठरल्या. याशिवाय खटल्यातील इतर साक्षीपुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने दत्तात्रयला सुवर्णाचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरवले. अन् दत्तात्रयला जन्मठेप व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot

Pages