728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

अमोल बागुल मतदार जनजागृतीचे 'मतदारदूत'

अहमदनगर । DNA Live24 - भारत निवडणूक आयोग, भारत सरकार, राज्य निवडणूक आयोग व जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने राष्ट्रपती पदकविजेते हरहुन्नरी कलाकार डॉ. अमोल सुभाष बागूल यांची मतदार जनजागृती अभियानासाठी मतदारदूत 'क्याम्पस अम्बेसेडर'म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यास येतो. गेल्या सात वर्षांपासून डॉ. बागूल यांनी मतदार जनजागृतीविषयक पथनाट्य, प्रभातफेरी, लेख, निबंध, घोषवाक्ये, पोस्टर, कविता, प्रदर्शने तसेच आयोगाच्या स्वीप 2 कार्यक्रमांतर्गत मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या ग्रामीण व शहरी भागातील क्षेत्रांमध्ये शेकडो पथनाट्ये सादर केली आहेत.

विविध सोहळ्यांचे सूत्रसंचालनातून मतदार जनजागृती, रांगोळी मेहंदी रेखाटनातून जागृती, निवडणूक प्रकियेतील सहभाग, सोशल मिडियाचा प्रभावी वापर केलेला आहे. या कार्याची दखल प्रशासनामार्फत घेण्यात आली. जिल्हाधिकारी अभय महाजन, उपजिल्हा निवड़णुक अधिकारी अरुण आनंदकर यांचे मार्गदर्शन डॉ. बागूल यांना याकामी लाभले आहे.

मतदार नावनोंदणी, मतदान नोंदणी, शहरी उदासिनता दूर करणे, मतदारांना लोकशाही प्रक्रियेबद्दल साक्षर करणे, १००% मतदारांची छायाचित्रे संकलित करण्याबाबत जनजागृती, मयत-दुबार-स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्याबाबत आवाहन, दिव्यांग व्यक्ती, महिला, युवक, वंचित समाज समूह, अनिवासी भारतीय व सैन्य दलातील व्यक्तींचा लोकशाही प्रक्रियेत सहभाग वाढवणेख् या उद्दिष्टांसाठी डॉ. बागूल यांना 'मतदारदूत-क्याम्पस अम्बेसेडर' म्हणून काम करायचे आहे.

बागूल यांनी जिल्हाभरात सादर केलेल्या मतदानविषयक जनजागृतीमध्ये किरण घालमे, शैलेश थोरात, चाणक्य नेहुल, केशव चौधरी, मंगेश गराडे, रोहित खंडागळे, अभिषेक कुलकर्णी, सार्थक डावरे, गणेश ढोणे या कलाकारांचा पथनाट्यात विशेष सहभाग होता.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: अमोल बागुल मतदार जनजागृतीचे 'मतदारदूत' Rating: 5 Reviewed By: DNA Live24