Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

गुरुवार, १८ मे, २०१७

भक्तीसंध्येत रंगले नगरकर रसिक !

अहमदनगर । DNA Live24 - पंडीत शौनक अभिषेकी यांनी गायलेल्या भक्तीपर गीतांच्या भक्तिसंध्येने नगरकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या अहमदनगर शाखेतर्फे भगवान परशूराम जयंतीनिमित्त भक्तिसंध्या कार्यक्रमाचे आयोजन माऊली सभागृहात करण्यात आले होते.

यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर सुरेखा कदम, उपमहापौर श्रीपाद छिंदम, सुवेंद्र गांधी, महेश कुलकर्णी, चेतन अमरापुरकर, जिल्हा न्यायाधीश श्रीपाद देशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीप-प्रज्वलन आणि भगवान परशुराम यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. त्यांना हार्मोनियमवर उदय  कुलकर्णी, तबल्यावर संजय  हिंगणे, पखवाजावर ज्ञानेश्वर  दुधाने, स्वरराज  शहा  व  अद्वैत केसकर यांनी साथ दिली. 

या  कार्यक्रमाला नगरवसियांनी भरभरून प्रतिसाद दिला. केदार केसकर, कन्हैया व्यास, प्रसन्न खाजगीवले, श्रेयस कुलकर्णी, सुनील कुलकर्णी, पुष्कर तांबोळी, सुदर्शन कुलकर्णी, संकेत होशिंग, पुष्कर शुक्रे, अभिजित कुलकर्णी, कृष्णा जोशी, रघुनाथ  सातपुते, वैभव उपकारे, प्रसाद बेडेकर, सौरभ देशपांडे, निखिलेश हिंगणगावकर आदींनी कार्यक्रमाच्या यशविस्तेसाठी परीश्रम घेतले.सूत्रसंचालन भारती कुलकर्णी व प्रसाद बेडेकर यांनी केले.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages