Header Ads

 • Breaking News

  कास्ट्राईब महासंघाच्या जिल्हा कार्यकारणीची फेरनिवड


  अहमदनगर । DNA Live24 - महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वार्षिक सभेत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची नोकर भरती, पदोन्नती, कालबध्द पदोन्नती व वेतन आयोग प्रश्‍नावर चर्चा करुन, कर्मचाऱ्यांचे संवेदनशील प्रश्‍न सोडविण्यासाठी संघटनेच्या कार्याची दिशा ठरविण्यात आली. राज्याध्यक्ष एन. एम. पवळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकित  जिल्हा कार्यकारणी पुर्नगठित करुन पदाधिकाऱ्यांची फेरनिवड करण्यात आली.

  यावेळी राज्यसचिव निवृत्ती आरु, राज्य उपाध्यक्ष सयाजी खरात, नाशिक विभागीय अध्यक्ष ना. म.साठे, फेरनिवड झालेले जिल्हाध्यक्ष के. के. जाधव, सरचिटणीस सुहास धीवर, कार्याध्यक्ष वसंत थोरात, उपाध्यक्ष संदीप बळीत, जिल्हा अतिरिक्त सचिव गुलाब जावळे, शहर उपाध्यक्ष दत्ता रनसिंग, जिल्हा महिला अध्यक्षा नंदा भिंगारदिवे, माया जाधव, भालचंद्र भवार, बाबुराव पानमळकर, स्वाती चौधरी, एस. टी. गोडाळकर, शिवानी कानडे, संजय केडगावकर, अशोक पारखी, सविता कोतकर व सभासद उपस्थित होते.

  साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल ना. म साठे यांचा संघटनेच्या वतीने गौरव करण्यात आला.  सेवानिवृत्त झाल्याबद्दल संघटनेचे नगर तालुकाध्यक्ष भालचंद्र भाकरे यांचा सत्कार झाला. बैठकित माध्यमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्‍नांवर चर्चा झाली. तालुका शाखा बळकटीकरणासाठी सभासदांनी नियोजनात्मक सुचना मांडल्या. नोकरभरती, सातवा वेतन आयोग, कालबध्द पदोन्नती व कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार बदल्यासंदर्भात पवळे यांनी मार्गदर्शन करुन, कास्ट्राईब महासंघाचा जिल्हा मेळावा व राज्य अधिवेशन घेण्यासाठी आढावा घेतला.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad