728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

बालसुसंस्कार शिबीरे काळाची गरज - सिनारे महाराज

अहमदनगर । DNA Live24 - विज्ञान युगामध्ये चांगल्या गोष्टींऐवजी माणुस सोशल मिडीयामध्येच अधिक गुंतून पडला आहे. त्याचे दुष्परिणामही समाजासाठी घातक आहेत, त्यामुळेच आजच्या काळामध्ये गावोगावी बालसुसंस्कार शिबीर आयोजित करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मनोहर महाराज सिनारे यांनी केले.

नगर तालुक्यातील भोरवाडी येथे आद्य जगद्गुरु शंकराचार्य वारकरी प्रतिष्ठाण व राधेश्याम परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने 1 मे ते 17 मे या कालावधीत दर्शनाश्रम या ठिकाणी बाल सुसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या शिबीरात पंचक्रोशीतील विद्यार्थी सहभागी झाले होते. दैनंदिन कार्यक्रमात गिता पाठ, हनुमान चालीसा पाठ, गिता संहिता, हरिपाठ पाठांतर, मृदंग वादन, हार्मोनियम वादन, गायन, पावल्या, हरिपाठ, प्रवचन, किर्तन आदी कार्यक्रम घेण्यात आले.

समारोपप्रसंगी सिध्दीनाथ मेटे महाराज यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. मेटे महाराज म्हणाले, आई वडील हे प्रथम गुरु असून त्यांनी लहानपणी मुलांच्या हातामध्ये सकाळी उठल्यानंतर मोबाईल न देता वही पेन दिल्यास त्याची बौध्दीक प्रगती होईल. वेळीच संस्कार केल्यास गावासह देशाचे नाव मोठे करतील.

यावेळी संजय महाराज महापुरे, शामसुंदर महाराज नानेकर, आत्मनिर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी, मच्छिंद्र म्हस्के, दत्तात्रय खांदवे महाराज, महेश महाराज कातोरे, तुकराम महाराज भोर,मनिषा गवळी, नितीन भोर, संदीप महाराज रासकर, विश्वास गावखरे, मंगेश माहाराज भोर, ऋषिकेश नरवडे,जालिंदर भोर, भुषण भोर आदी मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन संतोष महाराज वाघ यांनी केले तर आभार नितीन भोर यांनी मानले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: बालसुसंस्कार शिबीरे काळाची गरज - सिनारे महाराज Rating: 5 Reviewed By: DNA Live24