Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

मंगळवार, २३ मे, २०१७

'सेक्रेट हार्ट'च्या विद्यार्थ्यांनी उभारली माणुसकीची भिंत


अहमदनगर । DNA Live24 - समाजातील दुर्लक्षित वंचितांना वस्त्र व इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होण्यासाठी सेक्रेटहार्ट कॉन्व्हेंट हायस्कुल 2004 मधील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येवून माणुसकीची भिंत उभारली. नको असलेले ते द्या... हवे असलेले ते घेवून जा, या ब्रिद वाक्याखाली युवकांनी जुने बस स्थानक, जिल्हा परिषद जवळ घेतलेल्या माणुसकीची भिंत उपक्रमास नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी 200 पेक्षा जास्त गरजू व्यक्तींना वस्त्रांचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 280 ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी डॉ. नावेद शेख यांनी केली. पादचारी, झोपडपट्टीतील गरजू मुले, महिला व पुरुषांनी हवे असलेले वस्त्र घेण्यासाठी माणुसकीची भिंती जवळ एकच गर्दी केली होती. दिल्ली, मुंबई, पुणे तसेच अमेरिका व इंग्लंड मध्ये असलेले सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट हायस्कुलचे माजी विद्यार्थी नुकतेच एकत्र येवून हा सामाजिक उपक्रम घेतला.

प्रास्ताविकात भूषण भिंगारदिवे म्हणाले की, या भागात आठवड्यातून एकदा माणुसकीची भिंत उपक्रम घेतला जाणार असून, यासाठी माजी विद्यार्थी प्रयत्नशील आहे. नको असलेले साहित्य, वस्त्र येथे देण्याचे व गरज असलेले साहित्य, वस्त्र येथून घेवून जाण्याचे आवाहन त्यांनी केले. माजी विद्यार्थी विविध सामाजिक उपक्रम राबविणार असून, याचा प्रारंभ माणुसकीची भिंत या उपक्रमाद्वारे झाला आहे.

हा उपक्रम राबविताना देणाऱ्याचे हात कमी पडणार नसून, याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंन्त पोहचणार असल्याची आशा पौर्णिमा नगरे-क्षीरसागर यांनी व्यक्त केली. यावेळी अजिंक्य आढाव, पंकज किंगर, हितेश दर्डा, हर्षा तळरेजा, पल्लवी मुखर्जी, रेहान शेख, तौसिफ सौदागर, अक्षय भुजबळ आदिंसह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच माजी विद्यार्थ्यांच्या वतीने माळीवाडा येथील महात्मा फुले वसतिगृहास आर्थिक मदत देण्यात आली.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages