Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

बुधवार, ३ मे, २०१७

लाच स्वीकारताना नागापूरचा मंडलाधिकारी जेरबंद

अहमदनगर । DNA Live24 - शेतजमिनीची महसूल दफ्तरी नोंद लावण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंडलाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. दादासाहेब सखाराम बर्डे असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिस उपअधीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी नागापूरमध्ये ही कारवाई केली. 

बर्डे याने लाच मागितल्याची तक्रार एका व्यक्तीने नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. या व्यक्तीने ९३ एकर जमीन खरेदी केली होती. या जमिनीची नाशिक विभागाच्या निकालाप्रमाणे महसूल दफ्तरी नोंद घ्यावी, अशी मागणी होती. तसेच सुधारित सात बारा उतारा देण्यासाठी मंडलाधिकारी बर्डे याने ७ हजार रुपयांची लाच मागितली होती. या तक्रारीची दखल घेत ही कारवाई करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली नगर विभागातील पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, विष्णू आव्हाड, सहायक फौजदार काशिनाथ खराडे, पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनिल पवार, वसंत वाव्हळ, एकनाथ आव्हाड, पोलिस नाईक नितीन दराडे, तन्वीर शेख, चालक अंबादास हुलगे यांच्या पथकाने सापळा रचून ही कामगिरी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot

Pages