728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

अभिनेते मिलिंद शिंदे आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत !

अहमदनगर । DNA Live24 - चित्रपट, टीव्ही मालिका व रंगभूमी अशा तिन्ही माध्यमातून आपल्या सकस अभिनयानं स्वत:चं स्थान निर्माण केलेले अभिनेते मिलिंद शिंदे आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत समोर येत आहेत. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या एका सिनेमाचे दिग्दर्शन ते करत आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि  संवाद किरण बेरड यांनी लिहिले आहेत. या चित्रपटाचे शूटिंग शिर्डीत सुरु आहे.

मिलिंद शिंदे यांनी या पूर्वी 'नाच तुझंच लगीन हाय' आणि भिडू या दोन चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.   "भिडू" हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. शिवछत्रपती पुरस्कारात डावललेला एक खेळाडू काही कारणानं आपल्या गावी परत जातो. गावातल्या चोरी करणाऱ्या तीन मुलांना खेळाकडे आकर्षित करून तो त्यांना राष्ट्रीय स्तरापर्यंत कसं नेतो, याची गोष्ट सिनेमात दिसणार आहे.

'खेळावर आधारित एक कथानक हाताळताना वेगळा आनंद आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच वेगळा अनुभव देईल,' असं दिग्दर्शक मिलिंद शिंदे यांनी सांगितलं. बॉलिवूड चित्रपटांसारखीच भव्य-दिव्यता प्रथमच मराठी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, उदय टिकेकर, अभिजित चव्हाण, नयन जाधव, प्रकाश धोत्रे अशी तगडी स्टारकास्ट आहे. तर कॅमेरामन म्हणून प्रताप नायर व मंगेश धाकडे हे संगीतकार म्हणून काम पाहणार आहेत.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: अभिनेते मिलिंद शिंदे आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24