Header Ads

 • Breaking News

  बुधवारपासून नगरमध्ये मुळे स्मृती व्याख्यानमाला

  अहमदनगर । DNA Live24 - वनवासी कल्याण आश्रम नगर शाखेतर्फे यंदाही कै. ग. म. मुळे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. नगर अर्बन बँक, टीजेएसबी सहकारी बँक व जनता सहकारी बँक यांच्या सहकार्याने आयोजित या व्याख्यानमालेचा शुभारंभ बुधवार २४ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गोविंददेव गिरिजी महाराज (आचार्य किशोर व्यास) यांच्या हस्ते होणार आहे. पहिले व्याख्यान गोविंददेव गिरी यांचेच असून भारतीय व्यवस्थापन शास्त्र या विषयावर ते मार्गदर्शन करतील.

  माऊली सभागृहात होणाऱ्या या व्याख्यानमालेच्या उद्घाटन कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र प्रांत संघ चालक नानासाहेब जाधव, खासदार दिलीप गांधी, वनवासी कल्याण आश्रमचे जिल्हाध्यक्ष मेघश्याम बत्तीन, शहर अध्यक्ष प्रशांत मोहोळे, जिल्हा सचिव अभय गोले, शहर सचिव जयंत क्षीरसागर व सहयोगी बँकाचे प्रतिनिधी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

  वनवासी कल्याण आश्रमतर्फे वनवासींच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. वनवासी विध्यार्थी पालकत्व, वैद्यकीय सेवा, वनवासींसाठी वसतिगृहे, वनवासी सहल योजना आदी कार्यात लोकांनी सहभागी व्हावे तसेच वस्तू, धान्य व औषधे या स्वरुपात मदत करावी यासाठी सर्व कार्यकर्ते सतत कार्यरत आहेत. हे कार्य व्याख्यानमालेद्वारे समाजापुढे यावे लोकांचा सहभाग वाढावा, असा ही व्याख्यानमाला आयोजित करण्याचा निरपेक्ष हेतू अाहे.

  या व्याख्यानमालेस नगरमधील व जिल्ह्यातील नागरिकांनी मित्र परिवारासह उपस्थित रहावे, असे आवाहन वनवासी कल्याण आश्रमचे जिल्हाध्यक्ष मेघश्याम बत्तीन व संपर्क प्रमुख विशारद पेटकर यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वनवासी कल्याण आश्रमाचे सर्व पदाधिकारी सदस्य कार्यरत आहेत.

  व्याख्यानमालेचे वेळापत्रक - बुधवार, २४ मे गोविंददेव गिरी महाराज (आचार्य किशोरजी व्यास) - भारतीय व्यवस्थापन शास्त्र. गुरुवार, २५ मे डॉ. जयंत कुलकर्णी - राष्ट्रवादाची वैचारिक लढाई. शुक्रवार, २६ मे दिलीप धारूरकर - माहिती अधिकार: शस्त्र आणि शास्त्र. शनिवार, २७ मे वीणा देव - गोष्टी मुलाखतींच्या. रविवार, २८ मे पद्मश्री मिलिंदजी कांबळे - बदलता भारत. (वेळ दररोज सायंकाळी साडेपाच वाजता).

  Post Top Ad

  Post Bottom Ad