728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

सर्कस जिवंत राहण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न हवेत


अहमदनगर । DNA Live24 - नगरमध्ये इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत करमणुकीची साधने कमी आहेत. सर्कशीत केल्या जाणाऱ्या चित्तथरारक कसरती पाहून लोकांचे चांगले मनोरंजन होते. सर्कस लावण्यासाठी येणारा मोठा खर्च पाहता सर्कशींचे प्रमाण कमी होत चालले आहे. नगरकरांनी सर्कस जिवंत ठेवण्यासाठी ती पहायला हवी. कलाकारांची कला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष कुमारसिंह वाकळे यांनी केले.

पाईपलाईन रोड, यशोदानगर, एकवीरा चौकातील बाजार मैदानावरील एशियन सुपरस्टार सर्कसचे उद्घाटन वाकळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी गटनेते संपत बारस्कर, नगरसेवक बाबासाहेब वाकळे, डॉ. सागर बोरुडे, प्रकाश माने, मॅनेजर संतोष शिंदे, किरण दाभाडे, बाळासाहेब गायकवाड आकाश दंडवते, सचिन जगताप आदी उपस्थित होते. यावेळी वाकळे म्हणाले की, सर्कसीमध्ये आता हत्ती, वाघ, घोडे, कुत्रे, पक्षी यांना बंदी घालण्यात आली आहे.

लहान मुलांचे आकर्षण ठरणारी सर्कस आता प्रत्येकाला वेगळ्या रूपात अनुभवयाला मिळेल. या सर्कशीत कलाकार एक से बढकर एक कसरती करीत आहेत. सर्कस जिवंत राहण्यासाठी शासन दरबारी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे. सर्कसचे प्रकाश माने म्हणाले की, एशियन सुपरस्टार सर्कशीत सुमारे 100 कलाकार असून, प्रत्येकजण आपापल्या परीने नगरकरांचे मनोरंजन करणार आहे. यामध्ये विविध खेळ सादर करून प्रेक्षकांना एक वेगळा आनंद देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: सर्कस जिवंत राहण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न हवेत Rating: 5 Reviewed By: DNA Live24