Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

बुधवार, ३ मे, २०१७

झोपडपट्ट्यांतील वास्तव बदलण्याचा 'परिसस्पर्श'तून परिचय

अहमदनगर । DNA Live24 - झोपडपटटयातील वास्तव बदलण्याच्या तंत्र आणि मंत्रांचा परीसस्पर्श पुस्तकाच्या दुसर्या खंडातून परिचय होतो. झोपडपट्ट्यांतील वास्तव बदलण्यासाठीची प्रेरणा आणि दिशा देण्याचे सामर्थ्य या पुस्तकात अाहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि सिंजेन्टा फौंडेशनचे  अध्यक्ष प्रकाश आपटे यांनी या खंडाच्या प्रकाशन समारंभात केले.

मागील १५ वर्षांपासून झोपडपटटयातील वास्तव बदलण्यासाठी स्नेहालयचा बालभवन उपक्रम नगर शहरातील ८ झोपडपट्ट्यांतून कार्यरत आहेत. या प्रकल्पाचे मानद संचालक संजय बंदिष्टी यांनी पुढाकार घेऊन या कामातील दिशादर्शक अनुभवांचे लेखन येथील कार्यकर्ते आणि लाभार्थी यांना करायला लावले. मुन्ना खान, प्रा. दया भोर आणि शबाना शेख यांनी संपादन केल्यावर  परीसस्पर्श पुस्तकाचा  दुसरा खंड तयार झाला.

या खंडाचे प्रकाशन आपटे यांच्या हस्ते स्नेहालय प्रकल्पात  झाले. अध्यक्षस्थानी संजय हरकचंद गुगळे होते. यावेळी बंदिष्टी  म्हणाले, समाजातील वंचितांसाठी अल्प श्रमात व अल्प संसाधनात बालभवन प्रकल्प कोणीही सुरु करू शकते. स्नेहालयच्या प्रेरणेतून देशात वीस राज्यात शंभरावर बालभवने कार्यरत झाली आहेत. बालभवन प्रकल्प हीच देशाची आशा असल्याचे बजाज फिनसर्व कंपनीचे प्रमुख अजय साठे म्हणाले. स्नेहालाचे उपसंचालक हनीफ शेख यांनी आभार मानले.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages