728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

राष्ट्रवादीच्या प्रचाराचा अभंग-लंघे यांच्या हस्ते शुभारंभ

नेवासे । DNA Live24 - नेवासा नगर पंचायतीच्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ माजी आमदार पांडुरंग अभंग व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सोमवारी १५ मे रोजी श्री खोलेश्वर गणपतीला श्रीफळ वाढवून प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला.

यावेळी प्रभाग क्रमांक ११ मधील उमेदवार योगेश रासने, प्रभाग क्रमांक ३ मधील उमेदवार विलास पाटील कडू, प्रभाग क्रमांक ४ चे उमेदवार निर्मला विष्णू नवसे, प्रभाग क्रमांक ६ चे उमेदवार अनिता विनायक ताठे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक काशीनाथ आण्णा नवले, जनरल मँनेजर काकासाहेब शिंदे, उपस्थित होते.

नंतर यानंतर शिवाजीनगर (खळवाडी) येथील गणपती मंदिरासह विवेकानंदनगर येथील मारुती मंदिरामध्येही श्रीफळ वाढवून राष्ट्रवादीच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. जयप्रकाश रासने, सूर्यकांत रासने, दादासाहेब गंडाळ, विजय कावरे,  राम कर्जुले, अँड. प्रदीप वाखुरे, संपतराव ताठे गुरूजी, भैय्या कावरे, सचिन कडू, सुरेश ढोकणे, मयूर रासने, अरुण रासने, संदीप ताठे, बाळासाहेब आरगडे, आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: राष्ट्रवादीच्या प्रचाराचा अभंग-लंघे यांच्या हस्ते शुभारंभ Rating: 5 Reviewed By: DNA Live24