Header Ads

 • Breaking News

  पाकची खुमखुमी : सियाचीनजवळ लढाऊ विमानच उड्डाण !

  सियाचिन l DNA Live24 - भारताने कारवाई करत जम्मू काश्मिरच्या नौशेरा सेक्टरमधील पाकच्या चौक्या उद्ध्वस्त केल्याचं वृत्त समोर आल्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा सुरु झाल्या आहेत. पाकिस्तानने सियाचिनजवळ स्कर्दू भागात पाक सैन्याच्या लढाऊ विमानाचं उड्डाण केलं.

  पाकिस्तानी वायुसेनेने ‘मिराज’ हे जेट फायटर विमान सियाचिनजवळ स्कर्दू भागात बुधवारी सकाळी उडवल्याचं समोर आलं आहे. मात्र पाकिस्तानने पुन्हा एकदा रडीचा डाव खेळत भारताच्या हद्दीत विमान उडवलं नसल्याचा कांगावा केला आहे.

  पाकिस्तानी वायुदलातील सुत्रांच्या माहितीनुसार पाकचे सर्व ऑपरेटिंग बेसेस कार्यान्वित करण्यात आले आहेत. मिराज विमानाचं उड्डाण हे याचेच संकेत मानले जात आहेत. पाकिस्तानी हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्कर्दूतील एअरबेसला भेट दिल्याचंही म्हटलं जातं.

  चीफ ऑफ एअर स्टाफ सोहेल अमान यांनी पायलट्स आणि तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांची भेट घेतली. सोहेल अमान यांनी स्वतः काही वेळा मिराज जेट उडवली आहेत.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad