728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

पिन्या कापसे, बाप्प्या विघ्ने नाशिक जेलमध्ये

अहमदनगर । DNA Live24 - कुख्यात गुंड पिन्या कापसे व त्याचा साथीदार बाप्प्या विघ्ने (दोघेही रा. शेवगाव) यांची बीड कारागृहातून नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात दोघांनाही बीडच्या कारागृहातील सहा कैद्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद होताच पिन्या कापसेसह इतर ५ कैद्यांना सुरक्षेच्या कारणास्तव दुसऱ्या कारागृहात हलवण्यात आले आहे.

पिन्या कापसे याच्याविरुद्ध नगरमध्ये पोलिस कर्मचारी दीपक कोलते खून प्रकरणासह दरोडे, लुटमारीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. कोलते यांचा खून केल्या पासून कापसे फरार होता. त्याला विघ्नेची साथ होती. तब्बल दोन वर्षे फरार राहिल्यानंतर अखेर बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने जून २०१६ मध्ये या दोघांच्या सिनेस्टाईल पाठलाग करुन मुसक्या आवळल्या. यावेळी दोघांनी पोलिसांवर गोळीबार केला होता. प्रत्युत्तरादाखल पोलिसांच्या गोळीबारात विघ्ने जखमी झाला होता. तेव्हापासून पिन्या कापसे तुरुंगात आहे. बीडच्या कारागृहातून त्याने पळून जाण्याची धमकीही दिली होती.

सिगारेट मागण्याच्या कारणावरुन पिन्या कापसे व करण गायकवाड या दोन कैद्यांमध्ये मंगळवारी सकाळी वाद झाल्यानंतर तरुंग अधिकारी दोघांची चौकशी करत असताना करण गायकवाडच्या इतर साथीदारांनी पिन्या व बापु विघ्ने या दोघांना मारहाण केली होती. या प्रकरणी करण गायकवाड, महेंद्र महाजन, सचिन सूर्यवंशी, सय्यद गौस, नितीन शिंदे, अमोल गायकवाड यांच्यावर तुरुंग अधिकारी सी. एम. देवकर यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला होता.

पुन्हा या कैद्यांमध्ये भांडणे होऊ नये, कारागृहाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, म्हणून त्यांना दुसऱ्या कारागृहात हलवण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला. त्यानुासार करण गायकवाड, महेंद्र महाजन, सचिन सूर्यवंशी, सय्यद गौस, नितीन शिंदे यांना औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात हलवण्यात आले. तर कुख्यात गुंड पिन्या कापसे व बाप्प्या विघ्ने यांची रवानगी नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला आहे. 
- सी. एम. देवकर, तुरुंग अधिकारी

पिन्या कापसे आधीपासून पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला आहे. साडेतीन वर्षांपूर्वी त्याने पोलिसाचा खून केला. तत्पूर्वी त्याच्याविरुद्ध बीडमध्ये चकलांबा हद्दीत दरोडा, लुटमार, जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल होते. नोव्हेंबर २०१२ मध्ये तत्कालीन पोलिस अधीक्षक दत्तात्रेय मंडलिक यांनी पिन्यावर मोक्काअंतर्गत कारवाई केली होती. नगरचे तत्कालीन पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनीही त्याच्याविरुद्ध मोक्कानुसार कारवाई केली होती. तरीही पिन्या फरार होता.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: पिन्या कापसे, बाप्प्या विघ्ने नाशिक जेलमध्ये Rating: 5 Reviewed By: DNA Live24